डुकरांच्या बंदोबस्तासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:01 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:01:05+5:30

एका नागरिकाने चक्क व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आंदोलन सुरु केले आहे. कोणतेही निवेदन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही केवळ शहरातील डुकरांच्या कळपाचे फोटो काढून ते दरोज मूल शहरातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवायचे, अशा स्वरुपाच्या या आंदोलनाची आता प्रशासन कोणत्या प्रकारे दखल घेतले. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

'Whatsapp' agitation for pigs settlement | डुकरांच्या बंदोबस्तासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आंदोलन

डुकरांच्या बंदोबस्तासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आंदोलन

ठळक मुद्देरस्त्यांवर धुमाकूळ : अपघाताच्या घटनांत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल: शहरात मोकाट डुकरांची संख्या वाढली असून डुकरांचे कळप वर्दळीच्या रस्त्यावर मुक्तपणे धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शहरात दररोज अपघात घडत आहेत. वारंवार मागणी करुनही नगरपालिकेने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाहीत. त्यामुळे एका नागरिकाने चक्क व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आंदोलन सुरु केले आहे. कोणतेही निवेदन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही केवळ शहरातील डुकरांच्या कळपाचे फोटो काढून ते दरोज मूल शहरातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवायचे, अशा स्वरुपाच्या या आंदोलनाची आता प्रशासन कोणत्या प्रकारे दखल घेतले. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शहरात डुकरांची संख्या इतकी प्रचंड वाढली की, डुकरांचे कळप नागरिकांच्या घराच्या आवारात प्रवेश करुन धुडगूस घालत आहेत. ही डुकरे इतकी निडर बनली आहेत की, लहान मुलांवर हल्याचा देखील प्रयत्न करीत आहेत. एका महिन्यांपूर्वी राजेंद्र प्रसाद जुनी वस्ती परिसरात अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालिकेवर डुकरांचा कळप चालून आला होता. परंतु पालकांनी तिला डुकरांच्या तावडीतून सोडविले होते. डुकरांचे कळप वर्दळीच्या रस्त्यावर सैरावैरा धावत असतात. त्यामुळे अनेकदा दुचाकीचालकांचे अपघात घडत आहेत. एका महिन्यात किमान १० ते १५ अपघात डुकरांमुळे झाले आहेत. यापूर्वी डुकरांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिकेने कंत्राटदार नेमला होता. काही दिवस डुकरांना पकडून दूर नेऊन सोडण्यात आले. परंतु ही मोहीम मध्येच थांबली. मोकाट डुकरांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असताना नगरपालिका मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. जनभावना लक्षात घेऊन एका नागरिकांने डुकरांच्या बंदोबस्तासाठी व्हॉट्सअ‍ॅप आंदोलन सुरु केले आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरातील डुकरांच्या कळपाचे फोटो माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवावे, असे आवाहनाची त्यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: 'Whatsapp' agitation for pigs settlement