शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी सोयाबीन करपण्याच्या मार्गावर

By admin | Updated: October 3, 2014 01:20 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरूर उपकेंद्रावरून राजुरा तालुक्यातील विहीरगाव, नलफडी, कोहपरा, पंचाळा, चनाखा....

सास्ती : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरूर उपकेंद्रावरून राजुरा तालुक्यातील विहीरगाव, नलफडी, कोहपरा, पंचाळा, चनाखा परिसरातील गावात जवळपास १ हजार १०० शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा केला जातो. परंतु हा पुरवठा मागील काही दिवसापासून अनियमित व अपुऱ्या दाबाचा होत असल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. सिंचनाअभावी शेतातील उभे पिक करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी हवालदिल झाला आहे.राजुरा तालुक्यातील विरूर, विहीरगाव, नलफडी, मुर्ती, सिंधी, कोहपरा, धानोरा, कविठपेठ, चनाखा, पंचाळा, सातरी, नवी सातरी, चुनाळा या गावातील जवळपास १ हजार १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज पुरवठा देण्यात आला आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात कृषीपंप धारकांना वीज कनेक्शन दिल्यामुळे विजेचा अभाव असून कनेक्शन धारकांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंपेसुद्धा चालन नसून सिंचनाची सोय उपलब्ध असूनही अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे मात्र शेती सिंचनापासून वंचित आहे. सध्याच्या काळात शेतातील पिके भरणीवर आली असून पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सिंचनाअभावी उत्पादन क्षमतेतही मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मोठ्या प्रमाणात कृषी पंप धारकांची संख्या असल्यामुळे वीज पुरवठा अपुरा पडतो. पंप सुरू होताच अनेकदा उच्च दाबामुळे लाईन ट्रिप होते. त्यामुळे वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होतो.या भागात मोठ्या प्रमाणात विद्युत भारनियमन असल्यामुळे दिवसाच्या २४ तासातील फक्त २-३ तासच वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करीत शेती करावी लागत असून आता नविनच संकटाला समोर जावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)