शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील गावांत पाणी प्रश्न पेटला

By admin | Updated: February 4, 2015 23:11 IST

महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या चौदा गावांच्या विकासासाठी दोन्ही राज्य कोणतीच भूमिका घेत नाही. आंध्र प्रदेश सरकारने या गावांत काही विकास कामे केले

दोन्ही राज्याचे दुर्लक्ष : नागरिकांना त्राससंघरक्षित तावाडे - जिवतीमहाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या चौदा गावांच्या विकासासाठी दोन्ही राज्य कोणतीच भूमिका घेत नाही. आंध्र प्रदेश सरकारने या गावांत काही विकास कामे केले असले तरी अनेक कामे ठप्प आहेत. मुकदमगुडा, परमडोली या गावात आंध्र प्रदेश सरकारने २००२ मध्ये पाण्याची टाकी उभी केली असून याच टाकीद्वारे जलबंब पाणीपुरवठा सुरु आहे. तर महाराष्ट्र सरकारने याच गावात केवळ अर्धवट टाकी बांधून ठेवल्याने ती शोभेची वस्तु ठरत आहे.जिवती तालुका हा अतिदुर्गम असून पहाडावर वसलेला आहे. या तालुक्याला पाणी टंचाईची झळ दरवर्षी सहन करावी लागत असते. मात्र, महाराष्ट्र शासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. परमडोली, मुकदमगुडा, लेडीजान, शंकरलोधी, कोटा, लेंडीगुडा, भोलापठार, पद्मावती, पळसगुडा, अंतापूर, तांडा, येसापूर, नारायणगुडा, इंदिरानगर हे जिवती तालुक्यातील महाराष्ट्र- आंध्र प्रदेश सीमेवर वसलेली वादग्रस्त गावे आहेत. दोन्ही राज्य ही चौदा गावे आपआपल्या राज्यात असल्याचा दावा करीत असले तरी विकासाच्या बाबतीत ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करुन परमडोली येथे केवळ अर्धवट पाण्याची टाकी महाराष्ट्राने शासनाने बांधली आहे. तर दुसरीकडे याच गावात आंध्र प्रदेश सरकारने २००२ ला पाणी टाकी बांधली. या टाकीद्वारे मुबलक पाणी पुरवठा होत आहे. पाणी टंचाई भासल्यास येथील महिलांना एक ते दोन किमी अंतरावरुन पायपीट करत पाणी आणावे लागते.