शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

वरोराकरांची कोविड रुग्णांना सढळ हाताने मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:29 IST

वरोरा : शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद वरोरा तालुक्‍यात कोविडग्रस्तांची वाढती संख्या आणि त्यांच्याकरिता कमी प्रमाणात उपलब्ध प्राणवायूच्या खाटा ...

वरोरा : शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

वरोरा तालुक्‍यात कोविडग्रस्तांची वाढती संख्या आणि त्यांच्याकरिता कमी प्रमाणात उपलब्ध प्राणवायूच्या खाटा बघता रुग्णांचे प्राण वाचविणे हे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर असताना प्रशासनाच्या वतीने वरोरा शहरातील संस्था आणि दात्यांना प्राणवायूचे मशीन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

वरोरा शहरात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अनेकांनी चंद्रपूर, नागपूरसह आंध्र प्रदेशात खाटा मिळविण्याकरिता धडपड केली. मात्र त्या उपलब्ध नसल्यामुळे वरोरा शहरात त्यांची व्यवस्था करणे अवघड झाले आहे. यात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्याने वरोऱ्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी शहरातील सामाजिक संस्था आणि दात्यांना कॉन्सन्ट्रेटर मशीन तसेच प्राणवायूचे सिलिंडर भेट म्हणून देण्याची विनंती केली होती. याला शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला. यात आनंदवनाच्या वतीने आठ कॉन्सन्ट्रेटर मशीन आणि तीन जम्बो प्राणवायूचे सिलिंडर, संजोग चिटफंडच्या संचालकांकडून कॉन्सन्ट्रेटर मशीन, किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शंभुनाथ वरघणे, श्री गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष रमेश राजूरकर, संदेश चोरडिया, प्रमोद मगरे, बाळू चिंचोळकर, लोकमान्य विद्यालयाच्या १९९३च्या बँकचे अतुल गुंडावार व त्यांचे सहकारी, पुरुषोत्तम वांदिले, विनोद मणियार आणि सरकार ग्रुपचे अध्यक्ष आसिफ खान यांनी प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर मशीन्स भेट दिल्या. याशिवाय जीएमआर कंपनी, वर्धा पावर कंपनी आणि वेस्टर्न कोलफिल्ड कुचनाच्या वतीने ३० प्राणवायूच्या खाटा उपलब्ध झाल्या आहेत. नुकतेच हे सर्व साहित्य उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी प्रतिभा धानोरकर यांच्यासह तहसीलदार प्रशांत बेडसे, सुभाष दांदडे उपस्थित होते.

वरोरा शहराप्रमाणेच तालुक्यातसुद्धा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत.