शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूरच्या ग्रामसेविकेला मागविला खुलासा

By admin | Updated: May 2, 2015 01:14 IST

निकष डावलून खर्च केल्याच्या आरोपावरुन बाळापूर (बुज.) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला जिल्हा परिषदेच्या वतीने खुलासा मागविण्यात आला आहे.

नागभीड : निकष डावलून खर्च केल्याच्या आरोपावरुन बाळापूर (बुज.) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला जिल्हा परिषदेच्या वतीने खुलासा मागविण्यात आला आहे. या नोटीसमुळे पंचायत विभागात खळबळ उडाली आहे.पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेचा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त होतो. तो निधी कुठे आणि कसा खर्च करायचा, याचे काही निकष शासनाने ठरवून दिले आहेत. परंतु बाळापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका शुभांगी कावडकर यांनी हा निधी खर्च करताना शासनाने ठरवून दिलेले निकष लक्षात न घेता हा निधी खर्च केल्याचे निदर्शनास आले. यामुळे पर्यावरणाचा कोणताही उद्देश सफल होत नसून या खर्चासाठी सरपंच-सचिवास दोषी धरण्यात आले.या मुद्द्यावर १ लाख ३९ हजार २३७ रुपये खर्च करण्यात आले असून ही रक्कम वसुलपात्र आहे, असे नोटीसात म्हटले आहे. नियमबाह्य मासिक सभामुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या नियम (४) अन्वये मासिक सभेचे नोटीस सभा ठरविलेल्या तारखेच्या निदान तीन दिवस अगोदर व सभेची तारीख वेळ आणि ठिकाण, चालवायचे कामकाज यासंबंधीची माहिती सर्व सदस्यांना पाठवायला पाहिजे, असा नियम असताना बाळापूर ग्रामपंचायतीने २८ आॅक्टोबर २०१४ च्या मासिक सभेचे नोटीस २५ आॅक्टोंबर २०१४ रोजी काढले. हा कालावधी तीन ऐवजी दोन दिवसाचा होत असल्याने ही सभाच नियमबाह्य ठरविण्यात आली असून सभेत घेण्यात आलेले ठराव सुद्धा अवैध ठरविण्यात आले आहेत. यामुळे या सभेत ठराव घेवून खरेदी करण्यात आलेले बैठक ओटे खरेदीचा खर्च अवैध ठरविण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर सचिवाने बनावटीने दस्ताऐवज तयार करुन व ठराव लिहून घेतल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे.याशिवाय निविदा नियमानुसार न करणे, मुल्यांकणापेक्षा जास्त खर्च करणे, एकाच तारखेत दुबार-तिबार मंजूरी देवून अफरातफर करणे, एकाच बिलाचे तुकडे करुन रकमेचा अपहार करणे, आदी मुद्द्यावर सुद्धा खुलासा मागविण्यात आला आहे. या मुद्द्यांवरुन प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले असून ग्रामसेविका नोटीसाला काय उत्तर देतात याकडेही लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)