शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ऐवजी आता ‘सुंदर’ होणार गाव ! ग्रामपंचायतीला ७० लाखांचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 04:23 IST

स्मार्ट ग्रामयोजनेचे नामांतर करून ग्रामविकास विभागाने ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे केले. आधी स्मार्ट ग्रामयोजनेत तालुकास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना १० लाख व जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना ४० लाख असे एकूण ५० लाखांचा पुरस्कार देण्यात येत होते.

परिमल डोहणे -चंद्रपूर : ग्रामविकास विभागाच्या स्मार्ट ग्राम योजनेमुळे अनेक गावांना प्रोत्साहन मिळाले. आता या योजनेचे नामकरण ‘सुंदर गाव’ असे झाले असून, पुरस्कारातही शासनाने लाखोंची वाढ केली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सहभागी ग्रामपंचायतींत विकासकामांची चुरस रंगणार आहेत.स्मार्ट ग्रामयोजनेचे नामांतर करून ग्रामविकास विभागाने ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे केले. आधी स्मार्ट ग्रामयोजनेत तालुकास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना १० लाख व जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना ४० लाख असे एकूण ५० लाखांचा पुरस्कार देण्यात येत होते. आता सुंदर गाव स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना २० लाख व जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना ५० लाख असा एकूण ७० लाखांचा पुरस्कार देण्यात येईल.गावात होणार ही कामे -अपारंपरिक ऊर्जा व संबंधित अभिनव उपक्रम, स्वच्छतेबाबत अभिनव प्रकल्प, स्वच्छ पाणी वितरण प्रकल्प, महिला सक्षमीकरण व मुलांना अनुकूल प्रकल्प, भौगोलिक माहिती प्रणाली, आंतरराष्ट्रीय मानदंड, मार्गदर्शक तत्त्वे, संकलन आणि तपासणी सूची तयार करून दर्जा वाढविण्यासाठी प्रकल्प, सौर पथदिवे, वाय-फाय सिस्टीम, आदी बाबींवर या पुरस्कार निधीतून गावात कामे केली जाणार आहेत. ग्रामविकास विभागाने पुरस्काराच्या रकमेत लाखोंची वाढ केल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार