शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक दुकानदारीने घेतला लोकेशचा बळी

By admin | Updated: February 24, 2016 00:47 IST

खासगी शैक्षणिक संस्थांकडून पैशासाठी विद्यार्थ्याचा कसा छळ केला जातो आणि त्यातून विद्यार्थी आत्महत्येसारखा मार्ग कसा अवलंबतात,...

रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार : महाविद्यालयाविरुद्ध कारवाईची मागणीचंद्रपूर: खासगी शैक्षणिक संस्थांकडून पैशासाठी विद्यार्थ्याचा कसा छळ केला जातो आणि त्यातून विद्यार्थी आत्महत्येसारखा मार्ग कसा अवलंबतात, याचा प्रत्यय येथील लोकेश येरणे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेने आला आहे. लोकेशचा बळी खासगी शैक्षणिक दुकानदारीनेच घेतल्याच्या संतप्त प्रतिक्रीया येथे उमटत आहेत. दरम्यान, याप्रकरणी येरणे कुटुंबीयाकडून नागपूर येथील जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात येथील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. लोकेश हा नागपूर येथील जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने तृतीय सत्राची परीक्षा व प्रात्यक्षिकासाठी अर्ज केला होता. मात्र महाविद्यालयाच्या प्रशासनाने त्याच्याकडे १ लाख २० हजार रुपये शुल्काची मागणी केली होती. मात्र इतक्या तातडीने एवढी मोठी रक्कम भरण्याची लोकेशची आर्थिक परिस्थिती नसल्याने तो निराश झाला. त्याने महाविद्यालयाकडे मूळ कागदपत्रांचीही मागणी केली. मात्र शुल्क भरल्याशिवाय मूळ कागदपत्रेही देण्यास महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे लोकेशच्या मनावर परिणाम होऊन त्याने आत्महत्या केली, असे त्याच्या कुटुंबीयाकडून सांगण्यात आले. मृत लोकशच्या वडिलांचा येथील सपना टॉकीज परिसरात पानटपरीचा व्यवसाय आहे, तर त्याची आई माया येरणे स्थानिक चांदा पब्लिक स्कूलमध्ये नोकरीला आहे. मोठा मुलगा शुभम हादेखील नागपूर येथे शिक्षण घेत आहे. लोकेशला एक बहीण आहे. (प्रतिनिधी) ओबीसी कृती समितीचे निवेदनओबीसी कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यायात जावून निवेदन देण्यात आले. यात लोकेशच्या मृत्यूमागे शुल्क भरण्याचे कारण असल्याने संबंधित महाविद्यालयावर आणि सामाजिक न्याय विभागावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.