शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश बंधाऱ्यात अत्यल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

शासनाने शिवारात लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधले. त्यात काही बंधारे निधीअभावी रखडले आहे. तर काही बंधारे अर्धवट असून यात शासनाचा लाखो रूपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही, हे दुर्दैव आहे. यंदा हिवाळ्यातच बंधाºयात अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देकाही बंधारे आतापासूनच कोरडे : उन्हाळ्यात उद्भवणार टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा परतीच्या वेळी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेवटी-शेवटी पाणी जलसाठ्यांमध्ये साठले नाही. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. राजुरा तालुक्यातील अनेक बंधाऱ्यांमध्ये आतापासूनच अत्यल्प जलसाठा आहे. काही बंधारे तर आता जानेवारी महिन्यातच कोरडे पडले आहेत. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात राजुरा तालुक्यात पाणीटंचाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने शासनाने जलयुक्त शिवारसारखी सिंचनाच्या दृष्टीने शेतकºयांचे भले करणारी योजना अंमलात आणली. यापूर्वीही शासनाने शिवारात लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधले. त्यात काही बंधारे निधीअभावी रखडले आहे. तर काही बंधारे अर्धवट असून यात शासनाचा लाखो रूपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही, हे दुर्दैव आहे. यंदा हिवाळ्यातच बंधाºयात अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चार्ली, निर्ली, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, धिडशी, मारडा, मानोली, बाबापूर, हिरापूर परिसरातील पाण्याची पातळी खाली गेल्याने गावकºयांची चिंता वाढली आहे. राजुरा तालुक्यात शेकडो बंधारे शासनाने बांधले आहेत. मात्र आजघडीला या बंधाºयात पाण्याचा अत्यल्प साठा उरला नाही. काही बंधारे निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाहून गेले आहे. कर्तव्यात कसूर करणाºया कंत्राटदारांवर व संबंधित अधिकाºयांवर कारवाई होणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.

टॅग्स :water shortageपाणीकपात