शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदुरातील हातठेले घेऊन भाजीपाला विक्रेते नगर परिषदेवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

कोरपना : सकाळच्यावेळी गडचांदूर येथील शिवाजी चौकात भाजीपाला विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना शुक्रवारपासून कोणतीही सूचना न देता नगरपरिषदेच्यावतीने हटविण्यात येत ...

कोरपना : सकाळच्यावेळी गडचांदूर येथील शिवाजी चौकात भाजीपाला विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना शुक्रवारपासून कोणतीही सूचना न देता नगरपरिषदेच्यावतीने हटविण्यात येत असल्यामुळे संतप्त भाजीविक्रेत्यांनी चक्क नगरपरिषदेवर हातठेले नेऊन निषेध नोंदविला. मुख्याधिकारी विशाखा शेळके या मनमानी करत असल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी केला आहे.

अनेक वर्षांपासून येथील मुख्य चौकात भाजीविक्रेते भाजीपाला विक्रीसाठी बसतात. याठिकाणी ग्राहकांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असल्यामुळे विक्री चांगली होते. मात्र नगर परिषदेने कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देता शुक्रवारपासून या भाजी विक्रेत्यांना हटविणे सुरू केले. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकत नसल्याचे कारण पुढे करून आम्ही पोट कसे भरायचे, हा प्रश्न भाजी विक्रेत्यांनी निर्माण केला. यासंदर्भात मुख्याधिकारी विशाखा शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

कोरोनाच्या प्रकोपात भरचौकात सुरू होती दुकाने

कोरोनाचा प्रकोप सुरू असताना शिवाजी चौकात दुकाने सुरू होती. तेव्हा कोणालाच अडचण होत नव्हती. मात्र कोरोनाचा प्रकोप ओसरल्यावर भाजीपाला विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी अचानक दुकाने हटविण्याची नगरपरिषदेला घाई का झाली? हे समजणे कठीण आहे.

तात्काळ हटविण्याची आवश्‍यकता नव्हती - नगराध्यक्ष

मंगळवारी चिठ्ठ्या टाकून महात्मा फुले व्यापारी संकुलाच्या मागच्या जागेवर भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र चिठ्ठ्या टाकायच्या अगोदरच भाजीपाला विक्रेत्यांना हटविणे आवश्‍यक नव्हते. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटविले. याबाबत आपल्याला माहिती नसून, त्यांना मुख्याधिकाऱ्यांचा आदेश होऊ शकतो, असे गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सविता टेकाम यांनी म्हटले.

मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही

कोणतेही निर्णय घेत असताना पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे गडचांदूर नगरपरिषदेमध्ये दिसून येते. मुख्याधिकारी विशाखा शेळके यांच्या मनमानी कारभाराला नगर परिषदमधील अनेक नगरसेवक व पदाधिकारी कंटाळले आहेत.