शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

वामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिकारीला जात असत. ब्रिटीशांचा शिकारीचा कथा आजही गावातील वृध्दांच्या ओठावर आहेत. कधी काळी वर्दळ असलेले वामनपल्ली गाव आज भकास झाले आहे.

ठळक मुद्देकन्हाळगावप्रमाणे होते ‘शुटींग ब्लाक’

 निलेश झाडे    लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाले अन कन्हाळगाव, वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. ब्रिटिश काळात कन्हाळगाव आणि वामनपल्लीची शुटींग ब्लाक अशी ओळख होती. शिकारीसाठी आलेले राजे, ब्रिटिश अधिकारी वामनपल्ली येथे मुक्कामाने थांबायचे. ब्रिटीशांनी केलेल्या शिकारीचा कथा गावातील वृध्द आजही ऐकवितात. आता कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार, अशी आशा वामनपल्लीवासीयांना आहे.ब्रिटिश काळात चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा मोठी होती. जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेले कन्हाळगाव, वामणपल्ली  शुटिंग ब्लाक म्हणून ओळखले जायचे. राजे, ब्रिटिश अधिकारी येथे शिकारीसाठी यायचे. शिकारीसाठी आलेले ब्रिटीश कन्हाळगाव आणि वामनपल्ली येथे मुक्कामाने थांबायचे. वामनपल्ली येथे गेस्ट हाऊस होते. आज गेस्ट हाऊस जमीनदोस्त झाले आहे. आता शासनाने काही दिवसांपूर्वीच   कन्हाळगाव हा परिसर अभयारण्य घोषित केला आहे. तशी आधीपासूनच येथील नागरिक व लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या जंगलात वाघ, बिबटसह अनेक वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. 

ब्रिटीशांचे होते शिकारस्थळवामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिकारीला जात असत. ब्रिटीशांचा शिकारीचा कथा आजही गावातील वृध्दांच्या ओठावर आहेत. कधी काळी वर्दळ असलेले वामनपल्ली गाव आज भकास झाले आहे. मात्र काळाचा ओघात विस्मृतीत गेलेला वामनपल्लीचा इतिहास कन्हाळगाव अभयारण्य घोषित होताच पुन्हा उजेडात आला आहे. आता गावाचा विकास होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.

ब्रिटिश काळात वामनपल्ली गाव महत्त्वाचे ठिकाण होते. आज गाव मागासलेले आहे. ब्रिटिश काळाप्रमाणेच वामनपल्ली येथे वनविभागाने नव्याने गेस्ट हाऊस तयार करावे. अभयारण्याचे प्रवेशव्दार वामनपल्ली येथे उभे करावे. कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत होणाºया विकासकामात गावाला आणि गावातील बेरोजगारांना प्रथम संधी द्यावी.- साईनाथ कोडापे, माजी सरपंच, लाठी.

 

टॅग्स :forestजंगल