जोखीम पत्करून अखंडित वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:40+5:30

अपघातामुळे जीव जाणे व अपंगत्व येण्याचा घटना घडत असतात. वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला तर व्यक्ती अस्वस्थ होतात. मात्र, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन-पाऊस व थंडीत विजेच्या खांबावर चढून काम करणे अवघड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी ग्राहक घरी असताना, घराबाहेर येऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जोखमीचे काम वीज कर्मचारी करीत आहेत.

Uninterrupted power supply at risk | जोखीम पत्करून अखंडित वीजपुरवठा

जोखीम पत्करून अखंडित वीजपुरवठा

Next
ठळक मुद्देवीज कर्मचाऱ्यांची कामगिरी : संचारबंदीच्या काळात नागरिक घरात सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका प्रयत्नशील असतानाच रस्त्यावरील गर्दी रोखण्यासाठी पोलीस कर्मचारीही काम करीत आहेत. याचवेळी वीज क्षेत्रातील अभियंते, तांत्रिक, अतांत्रिक कर्मचारी व अधिकारी यांच्या योगदानामुळे ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होत आहे. अखंडित वीज पुरवठा केल्यानेच जिल्ह्यातील नागरिकांनी घरात थांबविणे शक्य झाले आहे.
अखंडित वीजपुरवठा करणाºया महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनात वीज कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. जोखीम पत्करून वीज पुरवठा सुरळीत ठेवत असतात. अनेकवेळा वीज अपघातांना त्यांना सामोरे जावे लागते. अपघातामुळे जीव जाणे व अपंगत्व येण्याचा घटना घडत असतात. वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला तर व्यक्ती अस्वस्थ होतात. मात्र, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन-पाऊस व थंडीत विजेच्या खांबावर चढून काम करणे अवघड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी ग्राहक घरी असताना, घराबाहेर येऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जोखमीचे काम वीज कर्मचारी करीत आहेत. गरजेनुसार विजेचा पुरवठा करण्यासाठी महानिर्मितीच्या वेगवेगळ्या वीज निर्मिती केंद्रात अभियंता व कामगारांनी योग्य प्रकारचे नियोजन केले आहे. वीज केंद्रात निर्माण झालेल्या विजेचे पारेषण करून महावितरणच्या वीज उपकेंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम महापारेषणद्वारे उत्तमरित्या केले जात असल्यानेच घरबसल्या काम करणे सोपे झाले आहे.

विशेष खबरदारी
जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले. बाजारपेठा व कार्यालये बंद झाली आहेत. कामासाठी कार्यालयात जाता येत नसल्याने ‘वर्क फ्राम होम’साठी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विशेष खबरदारी घेत आहे. वीज समस्या निर्माण होऊ नये, याकरिता पथक सज्ज ठेवण्यात आले.

कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत
घरातून काम करणे सोपे जाण्यासाठी महावितरणची तयारी
जिल्ह्यातील सर्व वीज कार्यालयात मनुष्यबळ सज्ज
घरबसल्या काम करण्याचेही नियोजन

Web Title: Uninterrupted power supply at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.