शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांचा असंतोष रस्त्यावर

By admin | Updated: March 14, 2015 01:07 IST

न्याय व विधी विभागातील गट क, व गट ड पदाची भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. इतर विभागातील पदेही याच पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

चंद्रपूर : न्याय व विधी विभागातील गट क, व गट ड पदाची भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. इतर विभागातील पदेही याच पद्धतीने भरण्यात येणार आहेत. शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून या निर्णयाच्या विरोधात जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांचा असंतोष शुक्रवारी रस्त्यावर उतरला. सुशिक्षीत बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली.महाराष्ट्र शासनाच्या कामगार व आयुक्त कार्यालयार्तंगत विविध कार्यालये येतात. तसेच या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली विविध मंडळे आणि क्षेत्रीय कार्यालये येतात. मात्र, येथील गट क व गट ड ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय तातडीने रद्द करून भरती प्रक्रिया पुर्ववत शासकीय पद्धतीने घेण्यात यावी, महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांचे परीक्षा केंद्र हे जिल्ह्याच्या ठिकाणी देण्यात यावे आदी मागण्या बेरोजगारांनी निवेदनात केल्या. शासकीय ग्रंथालयापासून मोर्चाची सुरूवात करण्यात आली. गांधी चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात श्रीकांत साव, सतीश खोब्रागडे, सतीश काकडे, अविनाश सारोकर, पराग जिझिवार, शुद्धोधन रायपुरे, महेश सोयाम, शितल वाकडे, सविता उंदिरवाडे, रोमा बिश्वास, साजिद शेख यांच्यासह हजारो बेरोजगारांचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)