Understand the Constitution for Rights | हक्कासाठी संविधान समजून घ्या
हक्कासाठी संविधान समजून घ्या

ठळक मुद्देनितीन चौधरी : चिमूर येथे ओबीसी हक्क परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : स्वातंत्र्य पूर्व काळात सर्वसमावेशक बजेट होता, तरी तेवढी गरीबी नव्हती. तेव्हा सुद्धा सर्वांनी समान न्याय मिळत होता. मात्र हल्ली देशाच्या राजकारणात असलेल्या पुढाऱ्यांनी वेगळच वातावरण तयार केले आहे. स्वातंत्र्याची ७३ वर्ष पूर्ण झाले, तरी गरीबीचा टक्का कमी झाला नाही. उलट वाढत आहे. एवढी भयानक परिस्थीती देशात निर्माण झाली आहे. ओबीसीना हक्क, अधिकार व न्याय पाहीजे असेल तर संविधाना समजून घेणे गरजेचे असल्याचे मत ओबीसी मुक्ती मोचार्चे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी व्यक्त केले.
वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान व राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाव्दारे तुकडोजी महाराज पतसंस्था सभागृहात आयोजित ओबीसी हक्क परिषदेप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अ‍ॅड भुपेश पाटील, अ‍ॅड. नितीन रामटेके, स्नेहदिप खोब्रागडे, तुषार पेंढारकर, रवींद्र उरकुडे, निलकंट शेंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी ओबीसींच्या हक्कासाठी लढणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यकमाचे संचालन विनोद गेडाम यांनी केले. प्रास्ताविक सुरेश डांगे, आभार रामदास कामडी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश भगत, मनोज राऊत, विनोद सोरदे, भाग्यवान नंदेश्वर, रावण शेरखुरे, जयदेव रेवतर, मधुकर पिसे, भुपेंद्र गडमडे, नितीन पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. परिषदेला ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Web Title: Understand the Constitution for Rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.