शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

शाळेबाबत अनिश्चितता शैक्षणिक साहित्य खरेदीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

मोठ्या प्रमाणात साहित्य असतानाही पाहिजे तसे ग्राहक फिरकत नसल्याने यावर्षी पुन्हा नुकसान होणार, अशी भीती व्यावसायिकांना आहे. त्यातच काही इंग्रजी शाळांनी शाळेतूनच पुस्तक खरेदी करणे पालकांना अनिवार्य केल्यामुळे त्याचाही परिणाम या व्यावसायिकांवर पडला आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : व्यवहार अद्यापही सुरळीत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाळा सुरु करण्यासंदर्भात अद्यापही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये संभ्रम आहे. याचा परिणाम शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना बसत आहे. मोठ्या प्रमाणात साहित्य असतानाही पाहिजे तसे ग्राहक फिरकत नसल्याने यावर्षी पुन्हा नुकसान होणार, अशी भीती व्यावसायिकांना आहे. त्यातच काही इंग्रजी शाळांनी शाळेतूनच पुस्तक खरेदी करणे पालकांना अनिवार्य केल्यामुळे त्याचाही परिणाम या व्यावसायिकांवर पडला आहे.यावर्षी कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना मार्च महिन्यापासूनच सुटी देण्यात आली. त्यातच आता शाळा सुरु करण्यासाठी शासन, प्रशासन तसेच पालकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे. त्यामुळे शासनाने तारखा जाहीर केल्या असल्या तरी शाळा सुरु होईल की, नाही याबाबत अद्यापही संभ्रम आहे. शाळा सुरु व्हायची असल्याने पालकही शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अनुत्साही आहे. दरम्यान, बाजारामध्ये केजी पासून इतर वर्गांचे पुस्तक उपलब्ध आहे. त्यामुळे काही पालकांनी पुस्तकांची खरेदी केली आहे. सध्या काही ठिकाणी वह्या, नोटबुक, वॉटर बॅग, शालेय गणवेश खरेदी करण्यात येत आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेमध्ये याचे प्रमाण अत्यल्प आहे.दरवर्षी जूनमहिन्यामध्येच लाखो रुपयांची शैक्षणिक साहित्याच्या विक्रीतून उलाढाल होते. मात्र यावर्षी अद्यापही बाजारामध्ये पाहिजे तसा उत्साह नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. प्रथम लॉकडाऊनमुळे तीन महिने दुकान बंद होते. त्यातच अजूनही बाजारात पाहिजे तसा उत्साह नाही. त्यातच शाळा सुरु करण्यासंदर्भात अद्यापही अश्चितता असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.मागील काही वर्षांमध्ये काही इंग्रजी शाळा शाळेतूनच पुस्तक, बुक विद्यार्थ्यांना देत आहेत.. त्यामुळे या व्यवसायावर परिणाम पडला आहे. त्यातच शाळा, महाविद्यालये सुरु व्हायचे असल्यामुळे शैक्षणिक साहित्याची मागणी कमी आहे.- निखिल तांबेकरशालेय पुस्तक विक्रेता, चंद्रपूर

टॅग्स :Marketबाजार