जादूटोण्याच्या प्रकार हाणून पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:43+5:30

शनिवारी जुनोना-कारवा मार्गावरील एका शेतशिवारातील घरात काही लोकांच्या संशयास्पद हालचाली नागरिकांना दिसून आल्या. त्यामुळे गावातील काही लोक सतर्क झाले. काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. त्यामुळे काही नागरिकांनी शेतशिवारात जाऊन संबंधित घराचा आडोसा घेतला असता, तिथे घरातून विचित्र अशा मंत्रोच्चाराचा आवाज येत होता.

The type of sorcery is destroyed | जादूटोण्याच्या प्रकार हाणून पाडला

जादूटोण्याच्या प्रकार हाणून पाडला

ठळक मुद्देम्हणे पैशाचा पाऊस पडणार : युवतीसह तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पैशाचा पाऊस पाडण्यासाठी बल्लारपूर तालुक्यातील जुनोना-कारवा मार्गावरील शेतशिवारातील एका घरात सुरू असलेल्या अघोरी तंत्र-मंत्र पूजेचा भांडाफोड करण्यात जुनोना गावातील ग्रामस्थांसह बल्लारपूर पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, पाच जणांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका युवतीसह प्रशांत बन्सोड, नरसिंग अकिल्लावार यांना अटक करण्यात आली. तर नथ्थु औरासे व मांत्रिक देवा हे पसार झाले आहेत. त्यांचा शोध बल्लारपूर पोलीस घेत आहेत.
शनिवारी जुनोना-कारवा मार्गावरील एका शेतशिवारातील घरात काही लोकांच्या संशयास्पद हालचाली नागरिकांना दिसून आल्या. त्यामुळे गावातील काही लोक सतर्क झाले. काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. त्यामुळे काही नागरिकांनी शेतशिवारात जाऊन संबंधित घराचा आडोसा घेतला असता, तिथे घरातून विचित्र अशा मंत्रोच्चाराचा आवाज येत होता. गावातील काही सतर्क नागरिकांनी जराही विलंब न करता बल्लारपूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. लागलीच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पोलिसांनी या घरावर धाड टाकून जादूटोणा व तंत्र मंत्राच्या आधारे सुरू असलेली पूजा उधळून लावली. अत्यंत निर्जन अशा ठिकाणी ही पूजा सुरू होती. मात्र पोलिसांनी या ठिकाणी धाडसाने पोहोचत ही पूजा व पूजा करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, पैशाचा पाऊस पाडण्यासाठीच्या या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, आणि मंत्र-तंत्राच्या नावाखाली ते आणखी काय काय करणार होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईदरम्यान जुनोना येथील ग्रामस्थांनी पोलिसांना मोठे सहकार्य केले.

Web Title: The type of sorcery is destroyed

टॅग्स :Policeपोलिस