चंद्रपूर : शहरातील ऊर्जानगर भागात असलेल्या राष्ट्रवादीनगरमध्ये रविवारी रात्री दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. या परिसरातील दोन घरांवर एकाचवेळी दरोडा घालत शस्त्राच्या धाकावर संबंधितांना मारहाण करीत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे.अलीकडे खून, चोऱ्या, मारहाण अशा घटनांमध्ये वाढ झाली असतानाच रविवारी रात्री संख्येने सात असलेल्या बुरखाधारी दरोडेखोरांनी राष्ट्रवादीनगरमध्ये धुडगूस घालून पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. रात्री १.३० वाजताच्या सुमारास हे बुरखाधारी दरोडेखोर राष्ट्रवादीनगरमध्ये शिरले. हा परिसर शहराच्या अगदी सीमेवर आहे. दरोडेखोरांनी या परिसरातील नारायण भानारकर व पुंडलिक कुंभारे यांच्या घराला आपले लक्ष्य बनविले. सर्वप्रथम त्यांनी आजुबाजुच्या घरांची दारे बाहेरून बंद केली. त्यानंतर त्यांनी नारायण भानारकर व पुंडलिक कुंभारे यांच्या घराची दारे मोठ्या दगडांचा मारा करून तोडली व घरात प्रवेश मिळविला. दोनही घरातील सर्वांना चाकू आणि गुप्तीच्या धाकावर एकत्र करून मारहाण करीत त्यांना एका खोलीत बंद केले. त्यानंतर आलमाऱ्यातील चिजवस्तू, सोन्याचे दागिने रोख रक्कम गोळा केली. पाहुणपणाने आलेल्या निकीता गेडाम हिच्या अंगावरील दागिने ओरबडून काढण्यात आले. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पोबारा केला. सुमारे पाऊण तास हे दरोडेखोर घरात धुमाकूळ घालत होते. (प्रतिनिधी)नागरिकांत संतापघरात लुटमार सुरू असताना परिसरातील काही नागरिकांना शंका आली. शेजाऱ्यांनी एकमेकांशी मोबाईलवरून एकमेकांशी संपर्क साधत दुर्गापूर आणि रामनगर पोलिसांनाही याबाबत सूचना केली. मात्र हा भाग नेमका कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो, यावर बराच वेळ मंथन झाले. दरोडेखोर घरात असताना सूचना देऊनही पोलीस पोहचत नसल्याचे नागरिक संतापले. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी पाच मिनिटाअगोदर दरोडेखोर तेथून पसार झाले होते, अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली. संशयिताचे रेखाचित्र जारीगेल्या काही वर्षांत पहिल्यांदा अशी दरोड्याची घटना घडल्याने ही घटना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी गंभीरतेने घेतली आहे. स्वत: संदीप दिवाण या घटनेच्या तपासावर लक्ष ठेऊन आहेत. सात दरोडेखोरांपैकी एका संशयिताचे रेखाचित्र जारी करण्यात आले असून त्या दिशेने तपास केला जात आहे.
राष्ट्रवादीनगरमध्ये दोन घरांवर दरोडा
By admin | Updated: November 17, 2015 01:51 IST
शहरातील ऊर्जानगर भागात असलेल्या राष्ट्रवादीनगरमध्ये रविवारी रात्री दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. या
राष्ट्रवादीनगरमध्ये दोन घरांवर दरोडा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}