शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या दोन नवीन जाती पूर्व प्रसारित

By admin | Updated: May 16, 2017 00:36 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रातून सन २०१७ मध्ये धानाच्या दोन नवीन जाती पूर्व प्रसारित करण्यात आलेल्या आहेत.

अधिक उत्पन्न देणारे वाण : सिंदेवाही विभागीय कृषी संशोधन केंद्रबाबुराव परसावार । लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रातून सन २०१७ मध्ये धानाच्या दोन नवीन जाती पूर्व प्रसारित करण्यात आलेल्या आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ९ मे २०१७ ला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी यांच्या अध्यक्षतेखाली शास्त्रज्ञाची सभा झाली. या सभेला संशोधन संचालक डॉ. डी.एम. मानकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. पी.जी. इंगोले, अधिष्ठाता (कृषी) डॉ. व्ही.एम. भाले, अधिष्ठाता (कृषी अभियांत्रिकी) डॉ. एम.बी. नागदेवे तसेच कृषी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ उपस्थित होते. पूर्व विदर्भ विभागातील धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती होण्याच्या दृष्टीकोनातून या विभागातील शास्त्रज्ञांनी सिंदेवाही केंद्रातून दोन धान पिकाच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती पूर्व प्रसारीत केल्या आहेत. साकोली या केंद्रातून एक प्रसारीत व एक पूर्व प्रसारीत धान वाण कृषी विद्यापीठ स्तरावरून प्रसारीत करण्यात आलेले आहे. त्यामध्ये कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथून पीडीकेव्ही-तिलक (एसवायई-५०३) हे धानाचे वाण पूर्व प्रसारीत करण्यात आले असून हे वाण १४०-१४५ दिवसात तयार होते. धानाची पोत श्रीराम या लोकल धान वाणासारखी असून श्रीराम या वाणापेक्षा २७.९१ टक्के अधिक उत्पन्न देणारी आहे. त्याचप्रमाणे सदर वाण हे खाण्यास अतिउत्तम व कीड आणि रोगाचा काही प्रमाणात प्रतिकार करणारे आहे. ही जात ठेंगणी व न लोळणारी आहे. तसेच या केंद्रावरून पीकेव्ही एचएमटीच्या बरोबरीची पोत असलेले नवीन वाण पीडीकेव्ही अक्षद (एसवायई-७०५) हे वाणसुद्धा पूर्व प्रसारीत करण्यात आलेले आहे. सदर धान वाण १३०-१३५ दिवसांचे असून पीकेव्ही एचएमटी पेक्षा २८.१६ टक्के अधिक उत्पन्न देणारे आहे. या धानाचा उतारासुद्धा अधिक आहे. सदर दोन्ही वाणाचे कृषी विभागामार्फत स्वीकृत वाण चाचणी प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतावर खरीप हंगाम २०१७ मध्ये घेण्यात येणार आहे. साकोली संशोधन केंद्रावरून साकोली-१० हे वाणसुद्धा पूर्व प्रसारीत करण्यात आले असून साकोली-९ हे वाण १३०-१३५ दिवसात तयार होणारे आहे. सदर धानाचा मध्यम-बारीक दाणा असून पीकेव्ही एचएमटी व आरपी ४-१४ पेक्षा अधिक उत्पन्न देणारे आहे. वरील धान वाणाच्या चारही जाती पूर्व विदर्भ विभागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत शेंडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली आहे.