शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

्रजटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी पालकमंत्र्यांच्या रडारवर

By admin | Updated: November 15, 2015 02:24 IST

चंद्रपूरकरांसाठी नेहमीची डोकेदुखी असलेली जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...

गेट परिसरात झाली स्टँडिंग मिटिंग : अधिकारी-नागरिकांनी सुचविले उपाय, सादर केले प्रस्तावचंद्रपूर : चंद्रपूरकरांसाठी नेहमीची डोकेदुखी असलेली जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढकार घेत शनिवारी चक्क गेट परिसरातच नागरिक आणि अधिकाऱ्यांची स्टँडिंग मिटिंग घेतली. या बैठकीत नागरिकांचे प्रस्ताव ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक समिती गठित करण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर नागरिकांनी सुचविलेल्या आराखड्यानुसार पहाणी करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. तीन महिन्यांपूर्वीच ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात ‘मेक इन चंद्रपूर’ अंतर्गत नागरिक-अधिकाऱ्यांची बैठक घेवून शहराच्या दृष्टीने उपाययोजना ऐकून घेतल्या होत्या. त्यानंतर शनिवारी चक्क जटपुरा गेट परिसरात रस्त्याच्या कडेला अधिकारी-नागरिकांची बैठक घेऊन तात्काळ मार्ग काढण्यासाठी पाऊल उचलले. जटपुरा गेटवर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी व वाहतूक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी अधिकारी व शहरातील नागरिकांची समिती गठीत करण्याचा निर्णय या स्टँडिंग बैठकीत जाहीर केला. बैठकीला आमदार नाना शामकुळे, राजुराचे आमदार संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, महापालिका आयुक्त सुधीर शंभरकर यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.जटपुरा गेटच्या खिडक्या तोडण्यासंदर्भात नागरिकांचे प्रस्ताव आले होते. त्यावर ना. मुनगंटीवार म्हणाले, जटपुरा गेट हा ऐतिहासिक वारसा असल्याने तो जपायला हवा. गेटला धक्काही न लावता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. जटपुरा गेटची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथील आॅर्कालॉजिकल डायरेक्टर आॅफ जनरल यांना येत्या पंधरा दिवसात चंद्रपुरात पाचारण केले जाईल. त्यांच्याकडून गेटची पहाणी करून दुरूस्तीच्या दृष्टीने आणि शहरात प्रवेश करावयाच्या मार्गावरील किल्ल्याची फुटकी भींत पाडून मार्ग मोठा करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. यासोबत शहरातील पुरातत्व विभागाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या वास्तूंची पहाणीही त्यांच्याकडून करून या सर्व वास्तूंचे जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.वाहतूक कोंडीसाठी उपाययोजना सुचविणाऱ्या नागरिकांसह तज्ज्ञ नागरिकांची समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गठित करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. जटपुरा गेटवरील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचवेल, नागरिकांच्या सर्व सूचनांचा समितीने विचार करावा असे त्यांनी सांगितले. पुरातत्त्व विभागाच्या प्रमुखांना येत्या सोमवारीच पत्र लिहून चंद्रपूर भेटीवर येण्याची विनंती करणारे पत्र लिहिण्याची सूचनाही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना केली. शक्य झाल्यास पुरातत्त्व विभागाच्या मंत्र्यांनाही भेटीसाठी विनंती करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. बसस्थानक ते रामाळा तलाव हा नवीन मार्ग निर्माण करणे तसेच रामगनर मार्ग एकेरी करून या मार्गाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वरोरा नाका चौकातील उड्डाण पुलावरील एक मार्ग २६ जानेवारीनंतर सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीनंतर पालकमंत्री व अधिकाऱ्यांनी जटपुरा गेटची पाहणी केली. बैठकीस शहरातील नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)‘लोकमत’ने दिला प्रस्तावजटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ‘लोकमत’नेही महत्वाचा प्रस्ताव दिला. त्यात, छोटा बाजार जवळील चांडक मेडिकल चौकापासून गेटकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन तयार करणे, जटपुरा गेटजवळ दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र सिग्नल लावणे, हा मार्ग नेहमीसाठी नो पार्किंग झोन घोषित करून परिसरालगत वाहनतळ निर्माण करणे या सूचनांचा समावेश आहे.नागरिकांच्या अशा आल्या सूचनायावेळी उपस्थित नागरिकांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या. यात विदेशी तंत्रज्ञान वापरून जटपुरा गेट मध्यभागी आणणे, परकोटाला लागून असलेले अतिक्रमण काढणे, रामनगर ते बगड खिडकी हा मार्ग निर्माण करून जड वाहतूक वळविणे, गेटवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन निर्माण करून जटपुरा गेटवर सिग्नल लावणे, फुटपाथचा आकार कमी करणे आणि त्यावरील अतिक्रमण दूर करून फुटपाथचा वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, भुयारी मागार्चा पर्याय तपासणे, रामनगर एकेरी मार्ग करणे, बायपास विकसित करणे, नो पार्किंग झोन तयार करणे आदी सूचनांचा यात समावेश आहे.