शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांच्या कर्जाचे होणार स्थानांतरण

By admin | Updated: July 9, 2017 00:48 IST

राज्यभरात २५ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत होते. शासनाने यावर्षी राज्यस्तरावरून बदल्या करण्याचे धोरण आखले,...

भांगडीया यांची माहिती : १७ हजार शिक्षकांना दिलासालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यभरात २५ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत होते. शासनाने यावर्षी राज्यस्तरावरून बदल्या करण्याचे धोरण आखले, मात्र अनेक शिक्षक त्या त्या जिल्ह्यातील कर्जबाकी असल्यामुळे त्यांना बदली होऊनही जाण्याची परवानगी मिळत नव्हती, ही बाब महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्याकडे मांडली. यांची दखल घेत त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला, त्यामुळे शासनाने ७ जुलै शुक्रवारी एक परिपत्रक काढून ही मागणी मान्य केली.यापूर्वी सर्वच आंतरजिल्हा बदल्या जिल्हा स्तरावरून होत होत्या. मात्र याच वर्षांपासून राज्य स्तरावरून आॅनलाईन बदल्या होत आहेत. त्यामुळे अनेकांना न्याय मिळाला. मात्र स्थानिक प्रशासन त्यांची अनेक बाबीत अडवणूक करीत होते. त्यासाठी शासनाने प्रत्येकवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बदल्या केल्या. मात्र बदली झाल्यावर भारमुक्त होतांना त्यांना या जिल्ह्यातील आपले बाकी असलेले कर्ज भरून नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. त्यावेळी शिक्षकांची अडचण होत होती. एकाचवेळी ५ ते १० लाखांचे कर्ज परतफेड करणे अशक्य होते, त्यामुळे इकडून तिकडून पैशांची जमवाजमव करुन पैसे उपलब्ध करण्याचा ते प्रयत्न करत असत. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस हरीश ससनकर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा नेते नारायण कांबळे, संघटक रवी वरखेडे, नरेंद्र मुंगले, सलीम तुर्के, भागवत नेहरकर यांनी चिमूर येथील आमदार भांगडीया यांची अन्यायग्रस्त शिक्षकांसह भेट घेतली. तसेच शिक्षकांची समस्या मांडली. यावेळी भारमुक्त आदेशासह असलेले कर्जही त्या जिल्ह्यात स्थानांतर व्हावे, अशी मागणी केली. तसेच कजार्ची रक्कम पगारातून कपात करुन नियमित कर्जफेड करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आ. भांगडीया यांनी सदर मागणीचा पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने सदर मागणी मान्य केल्याचे पत्रक शुक्रवारला जाहीर केले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बदली झालेल्या १७ हजार शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.