शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यपालन सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

By admin | Updated: December 21, 2014 22:57 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे व सहकार प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूरच्या वतीने भद्रावती व वरोरा तालुक्यातील मत्स्यपालन सहकारी संस्थाचे तीन दिवसीय सेवक प्रशिक्षण वर्ग वरोरा येथील मत्स्यपालन

भद्रावती : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे व सहकार प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूरच्या वतीने भद्रावती व वरोरा तालुक्यातील मत्स्यपालन सहकारी संस्थाचे तीन दिवसीय सेवक प्रशिक्षण वर्ग वरोरा येथील मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या सभागृहात पार पडले. सेवक प्रशिक्षण वर्गामध्ये भद्रावती, आष्टा, वरोरा, शेगाव, टेमुर्डा, खांबाडा, भटाळा, नागरी, माढेळी आदी मत्स्यपालन सहकारी संस्थांचे सेवक व पदाधिकारी यांचा सहभाग होता.प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दामोधर रूयारकर यांचे हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक निबंधक आर. एन. पोथारे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक एन. बी. कोंडावार, लेखा परीक्षक आर. ए. अनंतवार, संयोजक प्रा. आर. एस. आकोटे, शेगाव संस्थेचे अध्यक्ष देवराव ढोके, भद्रावतीचे दिलीप मांढरे व आष्टा येथील रविंद्र मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.तीन दिवस चाललेल्या सेवक प्रशिक्षण वर्गात सधन मिश्र शेती, तलावातील मिश्र मत्स्यशेती, मच्छिमार सहकारी संस्था व्यवस्थापन, नियोजन व महत्त्व, गोड्या पाण्यातील मत्स्य आणि कोळंबी शेतीचे व्यवस्थापन आणि सहकारी संस्थांच्या सभा, सभेचे प्रकार व महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरचे प्राचार्य वि.जे. ठोंबरे यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. संचालन व आभारप्रदर्शन प्रा. आकोटे यांनी केले. यावेळी सभासद उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)