प्रशिक्षणातून वाढतो अध्यापनाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:45+5:30

प्रमुख अतिथी डॉ. जी. के. आवारी, कैलास उमाळे, कार्यक्रम समन्वयक व विभाग प्रमुख डॉ. एस. डब्ल्यू. राजुरकर, सहाय्यक समन्वयक प्रा. ढोले प्रा. चिलबुले उपस्थित होते. पहिल्या दिवशी इन्फोसिसचे कैलास उमाळे यांनी एरोस्पेसमेन्य ूफॅक्चरिंगबाबत माहिती दिली. नागपूर तंत्रनिकेतनचे विभागप्रमुख डॉ. आवारी यांनी स्मार्ट मेन्यू फॅक्चरिंग व डिजिटल ट्रान्सफॉर्मशनची माहिती दिली.

Training increases the quality of teaching | प्रशिक्षणातून वाढतो अध्यापनाचा दर्जा

प्रशिक्षणातून वाढतो अध्यापनाचा दर्जा

Next
ठळक मुद्देपी. पी. बेडेकर : शासकीय अभियांत्रिकीत महाविद्यालयातप्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यंत्र अभियांत्रिकी हे अभ्यासक्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा विषयांचे प्रशिक्षण घेतल्यास प्राध्यापकांचे अध्ययन कौशल्य वाढते. विद्यार्थ्यांना मोठा लाभ होतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. पी. बेडेकर यांनी केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे सात दिवशीय इंडस्ट्री या विषयावर प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यात ६१ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रमुख अतिथी डॉ. जी. के. आवारी, कैलास उमाळे, कार्यक्रम समन्वयक व विभाग प्रमुख डॉ. एस. डब्ल्यू. राजुरकर, सहाय्यक समन्वयक प्रा. ढोले प्रा. चिलबुले उपस्थित होते. पहिल्या दिवशी इन्फोसिसचे कैलास उमाळे यांनी एरोस्पेसमेन्य ूफॅक्चरिंगबाबत माहिती दिली. नागपूर तंत्रनिकेतनचे विभागप्रमुख डॉ. आवारी यांनी स्मार्ट मेन्यू फॅक्चरिंग व डिजिटल ट्रान्सफॉर्मशनची माहिती दिली. विनायक गुपचुप यांनी सायबर सेक्युरिटी, डिजिटल टिष्ट्वन्स, मटेरियल हॅण्डलिंग अ‍ॅण्ड लॉजिस्टिक विषयावर मार्गदर्शन केले. टाटा टेकनोलॉजी सेंटरतर्फे सहभागी प्राध्यापकांना संगणकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. टाटा टेक्नॉलॉजीचे मनीष कुमार, डॉ. राजेंद्र कडू यांनी सिक्स सिग्मा विषयाची मांडणी केली. डॉ. जी. के. आवारी यांनी यंत्र अभियांत्रिकी विषयाशी संबंधित विविध पैलुंची माहिती दिली. विद्यार्थ्यांना या क्षेत्रात पुढे जायचे असेल, प्राध्यापकांना विषयाची सखोलता कळावी, यासाठी कोणत्या बाबींची गरज आहे, यावरही भाष्य केले. डॉ. राजुरकर यांनीही मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. प्रवीण पोटदुखे, डॉ. सी. पी. कळंबे, डॉ. आर. एस.सुरजूसे, डॉ. संजय राजूरकर यांच्या हस्ते प्राध्यापकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आयोजनासाठी डॉ. ढोले, प्रा. चिलबुले, डॉ. वानखेडे, डॉ. वाशिमकर, डॉ. इंगोले, प्रा. बुरांडे, प्रा. अंबाडकर, प्रा. मोहोड, डॉ. बागडे, प्रा. जामुनकर, प्रा. वाघ, प्रा. कुरेकर तसेच मेसा स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Training increases the quality of teaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.