रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:37+5:302021-04-11T04:27:37+5:30

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रॅक्टर मालकाचे नाव अमोल जुमडे रा. तळोधी (बा.) असून हा ट्रॅक्टर तळोधी (बा.)येथील ...

A tractor transporting sand overturned | रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला

रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ट्रॅक्टर मालकाचे नाव अमोल जुमडे रा. तळोधी (बा.) असून हा ट्रॅक्टर तळोधी (बा.)येथील तौशिक काझी शेख यांना रेती वाहतुकीकरिता किरायाने दिला असल्याची माहिती ट्रॅक्टर चालक ओमकार अशोक मस्के याने दिली.

या ट्रॅक्टरमध्ये रेती असून जवळपास चार मजूर उपस्थित होते. यामधील एकाला किरकोळ जखम झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच तळोधीचे पोलीस हवालदार शांताराम चनेकर, सतीश नेवारे यांनी पंचनामा करून ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जप्त केला. दरम्यान, तलाठी गणपत वरातकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन वलनीचे पोलीस पाटील शंकर बोरकर यांच्या उपस्थितीत पंचनामा केला.

Web Title: A tractor transporting sand overturned