विसापूर फाट्यावर ""टोल मुक्ती""आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST2020-12-13T04:41:36+5:302020-12-13T04:41:36+5:30

चंद्रपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनतर्फे शनिवारी देशव्यापी टोलमुक्ती आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली होती. या आंदोलनाला समर्थन ...

'' '' Toll Mukti '' 'agitation on Visapur fork | विसापूर फाट्यावर ""टोल मुक्ती""आंदोलन

विसापूर फाट्यावर ""टोल मुक्ती""आंदोलन

चंद्रपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनतर्फे शनिवारी देशव्यापी टोलमुक्ती आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली होती. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी किसान आंदोलन चंद्रपूरने बल्लारपूर रोडवरील विसापूर टोल नाका येथे टोलमुक्ती आंदोलन केले.

शेकडोंच्या संख्येने किसान आंदोलन चंद्रपूरचे कार्यकर्ते दुचाकी वाहनांनी रॅली घेऊन विसापूरच्या टोलनाक्याच्या दिशेने निघाले. त्यानंतर विसापूर टोल नाका येथे थांबून शेकडो शेतकरी बांधवांनी किसान एकता जिंदाबाद, जय जवान-जय किसान, भारत माता की जय अशी नारेबाजी केली. आदोलकांनी टोल नाक्यावरून जाणाºया जड वाहनांसाठी टोलनाका मुक्त केला. यावेळी नाक्यावरील कर्मचाºयांनी आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.परंतु आंदोलकांनी बळजबरीने वाहने सोडणे सुरू केल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची कुमक मागविण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना अटक करून बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले. आंदोलकांविरुद्ध कलम ६८ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना सोडण्यात आले.

या आंदोलनामध्ये जन विकास सेनेचे अध्यक्ष व मनपा नगरसेवक पप्पू देशमुख, किसान आंदोलन चंद्रपूरचे चमकोर सिंग बसरा, बलबीर सिंग गुरम, गुरूपाल सिंग, ग्यान सिंग, जितेंद्र सिंग बलोदा, दलजित सिंग नरेन, अनिल कोयचाळे,धर्मेंद्र शेंडे, चंदू झाडे,प्रवीण मटाले,आकाश लोडे उपस्थित होते.

Web Title: '' '' Toll Mukti '' 'agitation on Visapur fork