शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' वाघाचा मृत्यू विषबाधेने, शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 17:41 IST

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पोडसा (जुना) गावालगत शनिवारी रात्री मृतावस्थेत आढळलेल्या पट्टेदार वाघाचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब पुढे आली आहे.

गोंडपिपरी(चंद्रपूर) : मध्यचांदा वनविभागांतर्गत येणा-या धाबा वनपरिक्षेत्रात महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पोडसा (जुना) गावालगत शनिवारी रात्री मृतावस्थेत आढळलेल्या पट्टेदार वाघाचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब पुढे आली आहे. वाघाच्या मृतदेहापासून २०० मीटर अंतरावर एक डुक्कर मृतावस्थेत पडून होते. तसेच त्याच्याजवळ विषारी औषधही आढळून आले. या आधारे वाघाचा मृत्यू विषबाधेने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. शनिवारी रात्रीऐवजी रविवारी सकाळी वनविभागाच्या चमूने घटनास्थळीच वाघाचे शवविच्छेदन केले. यानंतर तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.पोडसा (जुना) येथील संतोष चनकापुरे यांच्या शेतात शनिवारी रात्री पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेनंतर तर्कवितकांना उधान आले होते. दरम्यान, वनविभागाच्या वतीने मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू आहे. अशातच वाघाचा ज्या जागेवर मृत्यू झाला. त्यापासून साधारणत: २०० मिटर अंतरावर एक डुक्कर मृतावस्थेत आढळून आले. त्याच्याजवळ विषारी औषध आढळून आले. यावेळी चंद्रपूर वनवृताचे मुख्य वनसरंक्षक रामाराव, मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहाय्यक उपवनसंरक्षक विवेक मोरे, धाब्याचे वनपरिक्षेत्राधिकारी राऊतकर आदींसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

वाघ नेमका कुठचा? घटनास्थळापासून सभोवताल ५ - ५ किलोमीटरवर जंगल नाही. दूरवर शेती लागून आहे. अशावेळी हा वाघ नेमका आला कुठून, शेजारीच डुकराचा मृत्यू कशाने झाला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. जंगल नसलेल्या परिसरात वाघ आल्याने शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे.