शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

बाधित तरुण हजाराच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना वगैरे काही नाही, आपल्याला कोरोनाची बाधा होत नाही, अशा अविर्भावात अनेक तरुणमंडळी वावरताना दिसतात. त्यामुळे संपर्कातून त्यांनाच कोरोनाची अधिक बाधा होत आहे.

ठळक मुद्देतरुणांनो सावधान : कोरोना नियमांचे करा पालन, अन्यथा परिस्थिती जाईल हाताबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग सध्या जिल्ह्यात झपाटाने वाढत आहे. विशेष म्हणजे हा संसर्ग तरुणांमगध्ये अधिक होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वयांचा विचार केला तर १९ ते ४० या वयोगटातील बाधितांच्या संख्या हजाराच्या आसपास पोहचली आहे. या वयोगटात तब्बल ९८४ जण बाधित झाले आहे. एकूण १७९९ रुग्णांच्या तुलनेत ही टक्केवारी ६० टक्क्याहून अधिक आहे.यावरून तरुणांनाच कोरोनाची अधिक बाधा होत असल्याने तरुणांनी आता गंभीर होणे गरजेचे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना वगैरे काही नाही, आपल्याला कोरोनाची बाधा होत नाही, अशा अविर्भावात अनेक तरुणमंडळी वावरताना दिसतात. त्यामुळे संपर्कातून त्यांनाच कोरोनाची अधिक बाधा होत आहे. एकूण १७९९ रुग्णांपैकी ९८४ रुग्ण १९ ते ४० वयोगटातील आहेत. तरुणांनीच आतागंभीर होणे गरजेचे झाले आहे.सोशल डिस्टन्सिंग गेले कुठे?चंद्रपूर जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिलता असली तरी सध्या लॉकडाऊन सुरूच आहे. छोटेमोठे दुकानात, प्रतिष्ठानामध्ये, हॉटेल्स व इतर ठिकाणी संबंधितांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही प्रतिष्ठानांमध्ये याचे पालन होताना दिसत नाही. याशिवाय नागरिकही नियमांचे पालन करताना दिसत नाही.मास्क नाकाच्या खालीघराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेषता वाहतूक पोलीस या नियमांचे सक्ती पालन करायला भाग पाडत आहे. मात्र अनेकजण कारवाइच्या भीतीने मास्क वापरताना दिसत आहे. अनेकजणांना मास्क कसा घालावा, हेदेखील कळालेले नाही, असे दिसते. अनेकजण मास्क नाकाच्या खाली उतरवून ठेवतात. मात्र अशाने संसर्गाचा धोका टळत नाही.१०८१ रुग्ण कोरोनामुक्तजिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या एक हजार १७९९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात अ‍ॅन्टिजेन चाचणी चालू असल्याने बाधितांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. मात्र यात समाधानाची बाब अशी की या आजारातून बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत १०८१ बाधित उपचाराअंती बरे होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. ही टक्केवारी ६० टक्क्याहून अधिक आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या