शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरी तालुक्यातील तीन सिंचन प्रकल्प धूळ खात

By admin | Updated: April 7, 2016 00:45 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रात गोंडपिपरी तालुका येतो. करोडो रुपये खर्चून गोंडपिपरी तालुक्यात सोनापूर टोमटा, किरमिरी, नंदवर्धन हे तीन सिंचन प्रकल्प...

कोट्यवधी रुपये पाण्यात : बळीराजाच्या जखमेवर प्रशासनाचे मीठगोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्रात गोंडपिपरी तालुका येतो. करोडो रुपये खर्चून गोंडपिपरी तालुक्यात सोनापूर टोमटा, किरमिरी, नंदवर्धन हे तीन सिंचन प्रकल्प २० वर्षापूर्वी उभारण्यात आले. पण अद्यापही कोणताही लाभ झालेला नाही. सदर सिंचन प्रकल्प धूळ खात आहेत. एकीकडे सिंचन प्रकल्पाचा लाभ नाही. दुसरीकडे मात्र गाळ काढणे, कालवे दुरुस्ती व इतर कामासाठी करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत. तेही पाण्याविनाच आहेत. त्यामुळे बळीराजाच्या साऱ्या अपेक्षा अधांतरी पडल्या. काही दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने बळीराजाचे कंबरडे मोडले जात आहे. अशावेळी सिंचन प्रकल्प कार्यान्वीत करणे गरजेचे आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंचन प्रकल्प धूळ खात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यात संताप दिसून येत आहे. गोंडपिपरी तालुक्याच्या सिंचन मुद्यावर राजुऱ्यातील नेत्यांनी आमदारकी मिळविली. ही परंपरा आताचीच नसून फार काळापासून चालत आलेली आहे. आता विद्यमान आमदार अ‍ॅड. संजय धोटे हाच वारसा चालवित आहेत. तालुक्यात वर्धा, वैनगंगा, अंधारी या बारमाही वाहणाऱ्या तीन नद्या आहेत. वर्धा नदीवर उभारण्यात आलेले सिंचन प्रकल्प दिवास्वप्नच ठरले आहे. शिवनीजवळ ४७ हजार करोड रुपये खर्चून तेलंगणा सरकार प्राणहिता नदीवर प्राणहिता चव्वेला महाधरणाचे काम करीत आहे. या धरणाने संपूर्ण तेलंगणा सुजलाम् सुफलाम् होणार आहे. याउलट बारमाही तीन मोठ्या नद्या असूनही गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी उपेक्षितच आहेत. गेल्या १५ वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाले. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशातच गेल्या महिन्यातील दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या ताज्या आहेत. तालुक्यातील शेतकरी निसर्गावरच अवलंबून आहे. सिंचन प्रकल्प रखडले असल्याने शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र प्रशासन मूग गिळून गप्प आहे. अशा स्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून सीमावर्ती भागातील बळीराजांना दिलासा देण्याचे काम आमदारांकडून अपेक्षित होते. मात्र त्यांचेही या मुद्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील आठ दिवसांपूर्वी गोजोली येथील युवकाने आत्महत्या केली होती. (शहर प्रतिनिधी)