ब्रह्मपुरीत साडे तीन लाखांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 05:00 AM2020-09-22T05:00:00+5:302020-09-22T05:00:26+5:30

दुचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात कब्रस्थान रोडवर नाकाबंदी केली. यावेळी एम एच ३४ एजे ४००५, एमएच २९ झेड ९५५३ या दुचाकीला थांबवून ९० एमएलच्या १० पेटा, १८० एमएलच्या आठ पेट्या, चार मोबाईल, दुचाकी असा एकूण तीन लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Three and a half lakh liquor stocks seized in Brahmapuri | ब्रह्मपुरीत साडे तीन लाखांचा दारुसाठा जप्त

ब्रह्मपुरीत साडे तीन लाखांचा दारुसाठा जप्त

Next
ठळक मुद्देचार जणांना अटक : ब्रह्मपुरी डीबी पथकाची कारवाई, सततच्या कारवाईने विक्रेत्याचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर कब्रस्थान रोडवर नाकाबंदी करुन चार दुचाकीस्वारांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे तीन लाख ५६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाइ रविवारी करण्यात आली. अमिर खान (२५) कासिम शेख (२२), समिर डोंगे (२१), जतीन मुलमुळे (२०) असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.
दुचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात कब्रस्थान रोडवर नाकाबंदी केली. यावेळी एम एच ३४ एजे ४००५, एमएच २९ झेड ९५५३ या दुचाकीला थांबवून ९० एमएलच्या १० पेटा, १८० एमएलच्या आठ पेट्या, चार मोबाईल, दुचाकी असा एकूण तीन लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाइ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पो. ह. खोब्रागडे, ना. पो. शी मुकेश, पो. शी. अजय, योगेश, अजय नागोसे आदींनी केली.

Web Title: Three and a half lakh liquor stocks seized in Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर