शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची हजारी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सध्या ७७ कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. तर ११५ कंटेन्मेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ११५ कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४०१ आरोग्य पथकाद्वारे १७ हजार ४१९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या ६९ हजार १७९ आहे. जिल्ह्यातील दुर्गापूर, घुग्घुस, बल्लारपूर, नागभीड कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले आहे.

चंद्रपूर : २ मेपासून जिल्ह्यात सुरू झालेली कोरोना संसर्गाची श्रृंखला आता बरीच लांब झाली आहे. ऑगस्ट महिन्यात दररोज २० ते ३० रुग्ण वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्याने हजारी पार केली. शुक्रवारच्या नव्या ३९ बाधितांंना मिळून जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १०२७ झाली आहे. एकूण १०२७ रुग्णांपैकी ६०९ रुग्णांचा कोरोनातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. आता ४०९ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून त्यांच्यावर चंद्रपुरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केला जात आहे. यातील दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्राने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२८२१ नागरिक बाहेर जिल्ह्यातून व बाहेर राज्यातून आले आहेत. यातील ९१ हजार १०८ नागरिकांना क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. आता काळजी घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात ७७ कंटेन्मेंट झोनजिल्ह्यात सध्या ७७ कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. तर ११५ कंटेन्मेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ११५ कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४०१ आरोग्य पथकाद्वारे १७ हजार ४१९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या ६९ हजार १७९ आहे. जिल्ह्यातील दुर्गापूर, घुग्घुस, बल्लारपूर, नागभीड कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहून लक्षणे दिसून आल्यास तत्काळ अ‍ॅन्टिजेन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.नवे ३९ बाधितशुक्रवारी ३९ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. यात चंद्रपूर शहरातील १७, चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील पाच, गडचांदूर येथील दोन, बल्लारपूर शहरातील सहा, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली आणि ब्रह्मपुरी येथील प्रत्येकी एक, राजुरा दोन तर वरोरा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. चंद्रपूरवगळता इतर ग्रामीण भागातील बाधितांमध्ये गडचांदूर येथील दोन, विवेकानंद वार्ड बल्लारपूर येथील दोन, गोकुळ नगर येथील तीन तर बल्लारपुरातील एक पॉझिटिव्ह पुढे आले आहे. पोंभुर्णा येथील एक, गोंडपिपरीतील एक, ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली येथील एक, सावली तालुक्यातील हिरापूर येथील एक बाधित पुढे आला आहे.संस्थात्मक अलगीकरणात ८७१ नागरिकजिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात ८७१ नागरिक आहेत. ग्रामस्तरावर ९१ नागरिक, तालुकास्तरावर ३६२ नागरिक तर, जिल्हास्तरावर ४१८ नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९२ हजार ८११ नागरिक दाखल झाले आहेत. यातील ९१ हजार १०८ नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. एक हजार ७०३ नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत. येत्या काही दिवसात त्यांचीही ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जिल्ह्यात अजूनही बाहेर जिल्ह्यातून नागरिक विनापरवानगी येत आहेत. त्यांनी आपली माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या