शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वृद्धांना आता स्वगृही परतण्याची आस !

By admin | Updated: February 4, 2015 23:11 IST

पोटच्या गोळ्यांनी बेघर केलेल्या असाह्य आई-वडिलांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षाची व्यथा ‘लोकमत’ने ‘पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र’

रुपेश कोकावार - बाबूपेठ (चंद्रपूर)पोटच्या गोळ्यांनी बेघर केलेल्या असाह्य आई-वडिलांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षाची व्यथा ‘लोकमत’ने ‘पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र’ या वृत्तातून मांडली. याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून बेजबाबदार मुलांना नोटीस बजावणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महाकाली परिसरात जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या वृद्धांना घरी परतण्याची आस लागली आहे. बुधवारी सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांनी महाकाली परिसरातील वृद्धांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यांची आपबिती ऐकून बेजबाबदार मुलांना नोटीस बजावण्याची तयारी दर्शवली. ज्या मुलांना लहाण्याचे मोठे केले, खांद्यावरती बसवून जग दाखवले, त्याच पोटच्या पोराने जीवनातील शेवटच्या वळणावर पोरख केले. अन् स्वत:च्या हक्काच्या घरुनही हाकलून देत बेघर केले. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी डोक्यावर छत शोधत अनेक वृद्धांनी महाकाली मंदिराचा आसरा घेतला. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्या हातात भिक्षापात्रही आले. मिळेल ते खाऊन जीवन जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षमय व्यथा ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित केली. या बातमीची दलख घेत महाकाली पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी ‘त्या’ पीडित वृद्धांची भेट घेवून त्यांच्यावर आलेल्या या दशेमागचे सत्य जाणून घेतले. आई-वडीलांवर अशी वेळ आणणाऱ्या मुलांना नोटीस पाठवण्यात येणार असून ‘तुम्हचे आई-वडील मंदिर परिसरात असून, त्यांना घरी नेण्यात यावे’ अन्यथा पुढील कार्यवाहीस तुम्ही पात्र राहाल, असे नमूद करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांमुळे आता आपण पुन्हा आपल्या हक्काच्या घरात परतणार, अशी ‘त्या’ वृद्धांना आस लागली आहे.