शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तके वाहतूक प्रकरणाची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद शाळांना पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून वाहतूक केली. मात्र, संबंधित विभागाकडून आर्थिक तरतूद करण्यात आली नाही.

ठळक मुद्देसहसंचालकांचा आदेश : मुख्याध्यापकांवर आर्थिक भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समग्र शिक्षा अंतर्गत २०२०-२१ या शैक्षणिक सत्राकरिता शाळांना मोफत पाठ्यपुस्तके न पोहोचविल्याने मुख्याध्यापकांना आर्थिक भुर्दंड बसला होता. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने (प्राथमिक) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक राजेंद्र पवार (प्रशासन) यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारी दखल घेवून जि. प. चे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तातडीने चौकशी करण्याचा आदेश १४ ऑगस्ट २०२० रोजी दिला आहे.जिल्हा परिषद शाळांना पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून वाहतूक केली. मात्र, संबंधित विभागाकडून आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे (प्राथमिक) सहकार्यवाह प्रकाश चुनारकर, विलास बोबडे, अमोल देठे, मोरेश्वर गौरकर, अजय बेदरे, संजय लांडे आदींनी सहसंचालक पवार यांच्याकडे तक्रार केली. समग्र शिक्षा अंतर्गत मोफत सर्व पाठ्यपुस्तके शाळेपर्यंत पोहचविण्याचे निर्देश दिले परंतु ही पाठ्यपुस्तके थेट शाळेत पोहचविण्यात आली नाही. संबंधित मुख्याध्यापकांना स्वखर्चाने पाठ्यपुस्तके न्यायी लागली. तालुकास्थळ ते शाळापर्यंतची पाठ्यपुस्तके वाहतूक करण्यासाठी दरवर्षी शासनातर्फे जि. प. शाळांना वाहतूक खर्च दिला जातो. या संदर्भात ई निविदा तसेच दरपत्रके मागविण्यात येतात. शिक्षण संचालनालयाकडून मोफत पाठ्यपुस्तके बालभारती गोदाम ते तालुकास्तरापर्यंत पोहचविण्याची तरतूद आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात उलट प्रकार घडल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केला आहे.शाळांना द्यावा वाहतूक खर्चतालुकास्तर ते शाळेपर्यंत पाठ्यपुस्तके पोहचविण्यासाठी स्वतंत्र निविदा, दरपत्रके मागविण्यात येतात. परंतु निविदेच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तके शाळेपर्यंत पोहचत नसल्यास निविदा मागविण्याचे औचित्य काय, असा प्रश्न शिक्षक परिषदेने तक्रारीतून विचारला होता. या प्रकरणांची चौकशी करून समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके जिल्हा परिषद शाळेपर्यंत न पोहचविल्याने पाठ्यपुस्तके उचल केलेल्या ठिकाणापासूनचा वाहतूक खर्च शाळांना देण्याची मागणी शिक्षक परिषदेचे चुनारकर व जिल्हा कार्यवाह अमोल देठे यांनी केली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद