मराठी माध्यमांच्या शाळांनाही चांगले दिवस येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:00+5:30

दि एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, पांढरकवडा, श्री बालाजी हायस्कूल बामणी या शाळांच्या आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

There will be good days for Marathi media schools too | मराठी माध्यमांच्या शाळांनाही चांगले दिवस येतील

मराठी माध्यमांच्या शाळांनाही चांगले दिवस येतील

Next
ठळक मुद्देनरेश पुगलिया : आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा महापूर आला आहे. असे असले तरी पुढील दहा वर्षांत मराठी माध्यमांच्या शाळांना चांगले दिवस येतील, असा विश्वास माजी खासदार तथा संस्थाध्यक्ष नरेश पुगलिया यांनी व्यक्त केला.
दि एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, पांढरकवडा, श्री बालाजी हायस्कूल बामणी या शाळांच्या आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अतिथी म्हणून डॉक्टर सुशील मुंधडा, संस्थेचे सचिव वसंतराव जवळे, अविनाश ठावरी, देवेन्द्र बेले, सुरेश साळवे, वरारकर, जीवतोडे, सुभाषसिंह गौर, अफजल शेख, हफीज शेख, मिश्रा, प्राचार्य भांडवलकर, प्राचार्य बन्सूले, प्राचार्र्य अनिता पंधरे, ठावरी, निंबाळकर, वऱ्हेकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता क्रीडा व कृषी क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करावे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी क्रीडांगणाचा पुरेपूर वापर करावा, क्रीडांगणासाठी संस्थेतर्फे कोणताही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पुगलिया यांनी यावेळी दिली. तीन दिवसीय कार्यक्रमामधील यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल चंद्रपूरचा संघ विजेता ठरला.
याप्रसंगी डॉ. सुशील मुंधडा, संस्थेचे सचिव वसंत जवळे, अविनाश ठावरी आदींनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य हरिहर भांडवलकर, संचालन संगीता बैद्य, संजय अंड्रस्कर यांनी तर आभार संजय वऱ्हेकर यांनी मानले.

Web Title: There will be good days for Marathi media schools too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा