शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने लोटूनही वेतन नाही

By admin | Updated: May 7, 2015 00:59 IST

कोरपना तालुक्यातील मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून अद्यापही वेतन देण्यात आले नाही.

रत्नाकर चटप नांदाफाटाकोरपना तालुक्यातील मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून अद्यापही वेतन देण्यात आले नाही. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या जवळपास ७०० कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वारंवार जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक आमदारांना निवेदने देण्यात आली. मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरविल्याची प्रतिक्रिया आता कामगारांमध्ये उमटत आहे.नुकतीच कामगारांनी चंद्रपूर येथे जाऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांची भेट घेतली. यावेळी मागील गुरुवारपर्यंत कंपनी प्रशासन भूमिका घेईल अन्यथा कंपनी प्रशासनाविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन कामगारांना देण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. परंतु तो दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या तीन महिन्यापासून मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कामगार आंदोलन करीत आहे. तर यापूर्वी उपोषणही करण्यात आले. परंतु कामगारांना न्याय मिळालेला नाही. हातात वेतनच मिळत नसल्याने कुटुंबाचा भार कसा सोसावा, असा प्रश्न आता कामगारांपुढे उभा आहे. ज्या स्थायी कामगारांना कामावर घेतलेले आहे, त्याही कामगारांची अवस्था कंत्राटी कामगारांप्रमाणेच आहे. यातील अनेक कामगार बाहेरगावावरून आलेले असून किरायाणे राहतात. मुलांच्या इंग्रजी शिक्षणाची सोय म्हणून शहरात राहावे लागत असल्याने महिन्याचा खर्चही वाढत आहे आणि यातच गेले तीन महिने उधारी करून रोजची गरज भागविली जात आहे. कामगारांच्या आंदोलनाला नेत्यांनी भेटी दिल्या. प्रसंगी सांत्वन केले. परंतु वेतनाचा प्रश्न मात्र कायम आहे. सध्या कंपनी बंद असून उत्पादनही काढले जात नाही. उत्पादन निघाल्यानंतर लगेच वेतन दिले जाईल, अशी उत्तरे कंपनी प्रशासनाकडून मिळत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. काही कामगार या कंपनीत गडचांदूर, कोरपना, वणी आदी ठिकाणाहून दुचाकीने येतात. त्याचा रोजचा खर्च साधारण १०० रुपये आहे. १ रुपयाही मिळत नसल्याने काही कामगारांनी कंपनीत कामास येणेही बंद केल्याचे दिसते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी कामगारांची मागणी आहे.