२४ तासात चंद्रपुरात एकही पॉझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:20 IST2021-07-10T04:20:33+5:302021-07-10T04:20:33+5:30

बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मूल १, भद्रावती १, वरोरा २, कोरपना १ व जिवती तालुक्यातील एकाचा समावेश आहे. चंद्रपूर तालुका, ...

There is no positive in Chandrapur in 24 hours | २४ तासात चंद्रपुरात एकही पॉझिटिव्ह नाही

२४ तासात चंद्रपुरात एकही पॉझिटिव्ह नाही

बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मूल १, भद्रावती १, वरोरा २, कोरपना १ व जिवती तालुक्यातील एकाचा समावेश आहे. चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. बाधितांची संख्या ८४ हजार ७९२ वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार ९२ झाली आहे. सध्या १७६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ५ लाख ७६ हजार १२० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ८८ हजार ४९७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५३३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, पात्र नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: There is no positive in Chandrapur in 24 hours