शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिने लोटूनही वेकोलिच्या गृहकराचा करार नाही

By admin | Updated: October 19, 2016 01:01 IST

दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने वेकोलि, एसीसी, लॉयड मेटल व्यवस्थापनाशी गृहकराबाबत मागणी करण्यात येते ..

घुग्घुस ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : पैशाची चणचण, कर्मचाऱ्यांचे वेतन नाहीघुग्घुस : दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने वेकोलि, एसीसी, लॉयड मेटल व्यवस्थापनाशी गृहकराबाबत मागणी करण्यात येते आणि मार्च-एप्रिल दरम्यान व्यवस्थापन, ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये करार करण्यात येते. यावर्षी घुग्घुस ग्रामपंचायतीकडून एसीसी, लॉयड कंपन्याशी करार करण्यात आला. मात्र आॅक्टोबर महिना लोटूनही वेकोलिशी करार करण्यात आला नाही. त्यामुळे वेकोलिकडून गृहकराची रक्कम निश्चित झाली नाही आणि कर न मिळाल्यामुळे घुग्घुस ग्रामपंचायत आर्थिक संकटात सापडली आहे.घुग्घुस ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अयोग्य नियोजनाअभावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे चार महिन्यापासून वेतन रखडले आहे. केवळ अडव्हान्सवर कारभार चालत आहे. एसीसीकडून २२ लाख, लॉयडकडून ९ लाख तर वेकोलिकडून २१ लाख रुपये दरवर्षी ग्रामपंचायतीला प्राप्त होत असते. या वर्षीचा लायड व एसीसी कंपनीशी करार झाला असला तरी वेकोलिशी अजूनही करार करण्यात आला नाही. त्यामुळे पैश्याची चणचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीला आठवडी बाजाराच्या लिलावापासून १३ लाख ९९ हजार व दैनिक गुजरी लिलावापासून २ लाख ९९ हजार रुपये मिळत आहे. त्या व्यतिरिक्त गावातील गृहकर, पाणीपट्टी कराची रक्कम मिळत असते. ग्रामपंचायतीमध्ये ५५ स्थायी व २४ रोजंदारी कर्मचारी असा ७९ कर्मचारी कार्यरत आहे. दर महिन्यात तीन साडेतीन लाख रुपये वेतनावर खर्च होत असते. न्यायालयााने कर वसुली थांबविल्याने ग्रामपंचायतीचे ताळमेळ बिघडले, अशी माहिती आहे. (वार्ताहर)आपसी वादविवादाचा फटकाग्रामपंचायतीने लॉयड, एसीसीकडून करार केला. मात्र वेकोलिशी करार संपुष्टात येवूनही सहा महिने लोटूनही अजूनही करार का केला नाही, हा प्रश्नच आहे. वेकोलिशी करार झाला असता तर कर मिळाला असता आणि समस्या सुटली असती. मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या आपसी वादविवाद आणि ताळमेळ नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी सारखा सण जवळ आला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग वेतन केव्हा मिळेल, या प्रतीक्षेत आहे.