शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By परिमल डोहणे | Updated: June 10, 2025 16:03 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ब्लड बँकेतील स्थिती : स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन

परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेली संख्या, गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा घसरलेला टक्का त्यासोबतच चंद्रपूर शासकीय महाविद्यालयात रुग्णांची वाढलेली संख्या यामुळे रक्तसाठ्याची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी चंद्रपुरातील के. डी. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये केवळ दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर तसेच नियमित रुग्णांना रक्तपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पडला आहे.

चंद्रपुरात के. डी. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने येथे अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा मिळत आहेत. यामुळे चंद्रपूर, गडचिरोलीसह, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील रुग्ण चंद्रपुरात उपचारासाठी येतात. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. याशिवाय, सिकलसेल, थलेसेमिया, कॅन्सरबाधित रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या जीएमसीतील ब्लड बँकेत केवळ १२८ पिशव्या ब्लड उपलब्ध आहे. हे रक्त केवळ दोन दिवस पुरू शकते. त्यामुळे रक्ताची भीषण टंचाई पाहता दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावाउन्हाळा असल्याने रक्तदान शिबिर घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यात सद्यास्थितीत रक्ताचा साठा अल्प प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिर राबविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासोबतच इतर रक्तदात्यांनी रक्तदानासाठी सामोरे जाणे गरजेचे आहे. सामाजिक संस्थांनी शिबिरासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

खासगी बल्ड बँकेतीलही स्थिती जैसे थे !चंद्रपुरातील खासगी ब्लड बँकेतची रक्ताचा साठा अत्यल्प असल्याची माहिती रक्तकोष पोर्टलवर दिसून येत आहे. त्यामुळे स्क्तटंचाई भासण्यापूर्वी रक्तसंकलन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिसून येते.

दररोज ५० पिशव्यांची मागणीचंद्रपुरात अद्ययावत के. डी. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. येथे चंद्रपूर, गडचिरोलीसह, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे दररोज ४० ते ५० युनिटची मागणी असते. मात्र, त्या तुलनेत ब्लड संकलित होत नाही. परिणामी ब्लडची टंचाई नेहमीच दिसून येते. 

चंद्रपुरात चार ब्लड बँकचंद्रपुरातील के. डी. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही शासकीय, ख्रिस्तानंद एज्युकेशन सोसायटी ब्लड सेंटर, चंद्रपूर ही चॅरिटेबल ब्लड बँक, तर संजीवन ब्लड सेंटर व अंकुर ब्लड सेंटर या दोन खासगी ब्लड बैंक अशा एकूण चार ब्लड बँक आहेत.

"शासकीय महाविद्यालयात चंद्रपूरसह परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे दररोज ४० ते ५० युनिट रक्ताची आवश्यकता असते. त्या तुलनेत ब्लड संकलित होण्याचे प्रमाण कमी आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. रक्तदान श्रेष्ठदान असल्याने सामाजिक संस्था, तसेच रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे."- डॉ. अमित प्रेमचंद, रक्तपेढी विभागप्रमुख तथा अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीchandrapur-acचंद्रपूर