शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचार विभागाची सेवा ‘नॉट रिचेबल’

By admin | Updated: July 12, 2017 00:44 IST

राज्यात तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मूल शहरात दूरसंचार विभागाची सेवा मात्र नकोशी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : राज्यात तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मूल शहरात दूरसंचार विभागाची सेवा मात्र नकोशी झाली आहे. सद्यास्थितीतील सेवेमुळे ग्राहक त्रस्त झाले असून अनेक ग्राहक दूरसंचार विभागाची सेवा बंद करण्याच्या तयारीत आहेत. मूल शहरातील शासकीय कार्यालय तथा शाळा-महाविद्यालय मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यादृष्टीने दूरसंचार विभागाची सेवा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. यामुळे मूल शहरवासीयांना इंटरनेट सारख्या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. मागील आठ दिवसांपासून मूल तालुक्यात दूरसंचार विभागाचे भ्रमणध्वनी पाहिजे त्याप्रमाणात काम करीत नाही. थ्री जी सेवा आहे. परंतु, तेही केवळ नावापुरतीच. त्यामुळे अनेक ग्राहक आता भारतीय दूरसंचार विभागाचे सीमकार्ड बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत. येथील दूरसंचार विभागाचे तत्कालीन अधिकारी यादव यांनी मूल शहरात थ्री-जी सेवा देण्यासाठी प्रयत्न करून थ्री-जी सेवेचा लाभ मूलवासीयांना मिळवून दिला. परंतु यादव यांची बदली होताच दूरसंचार विभागाच्या सेवेचे तीन-तेरा वाजले आहे.मूल शहर हे तालुक्याचे ठिकाणी असून गेल्या २५ वर्षांपासून नगर पालिका कार्यरत आहे. या ठिकाणी महसूल विभागाचे उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय, यासह विविध कार्यालय कार्यरत आहेत. परंतु भारतीय दूरसंचार निगमकडून योग्य सेवा मिळत नाही. यामुळे विविध विभागाच्या कार्यालयांना व व्यापाऱ्यांना इंटरनेट व भ्रमणध्वनी सेवेची अडचण येत आहे.