तेलंगणाच्या मजुरांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:49+5:30

रविवारी सकाळपासूनच गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीच्या सीमावर्ती भागात तेलंगणा राज्यातून हजारोंच्या संख्येने मजूर परत येत असल्याने प्रशासनाने दक्षता घेत सीमावर्ती भागातील पोडसा या गावी आरोग्य विभागाची चमू, महसूल प्रशासन चमू, तसेच पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

Telangana workers get support | तेलंगणाच्या मजुरांना मिळाला आधार

तेलंगणाच्या मजुरांना मिळाला आधार

ठळक मुद्देआरोग्य तपासणीसह भोजन व परतीच्या प्रवासाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : लॉकडाऊनमध्ये राज्यातील हजारो मजूर हे तेलंगाा राज्यात अडकले. तेथे हाती काम नसल्यामुळे उपासमारीचे संकट उदभवलेल्या मजुरांनी अखेर पायदळ प्रवासातून मूळ गावी परतण्याचा प्रवास चालविला. याच दरम्यान शनिवारी हजारो मजूर तेलंगणा सीमावर्ती भागातून महाराष्ट्र राज्य सीमेत दाखल झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच या वृत्ताची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांनी राज्य सीमावर्ती भागातील पोडसा येथे भेट देत आलेल्या मजुरांची विचारपूस करून आरोग्य तपासणी केली. भोजन व्यवस्था तसेच मजुरांच्या मूळगावी पोहोचण्याची सोय करून दिली.
रविवारी सकाळपासूनच गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीच्या सीमावर्ती भागात तेलंगणा राज्यातून हजारोंच्या संख्येने मजूर परत येत असल्याने प्रशासनाने दक्षता घेत सीमावर्ती भागातील पोडसा या गावी आरोग्य विभागाची चमू, महसूल प्रशासन चमू, तसेच पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
असे असताना पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने तेलंगणा येथे रोजगाराच्या शोधात गेले. महाराष्ट्रीयन मजूर हे पोळसा या गावी येऊन धडकले. तालुका प्रशासनाच्या वतीने अन्नधान्य व इतर साहित्य देत मजुरांना भोजन व्यवस्था करून आरोग्य तपासणीसाठी जागरूक केले. यानंतर जिल्ह्याचे ना.विजय वडेट्टीवार, खा. धानोरकर, आ.सुभाष धोटे यांनी पोळसा या गावाला भेट दिली. मजुरांना त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविण्याची सोय केली.

Web Title: Telangana workers get support