शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी उपाय योजनेतील शिक्षक पाच महिन्यांपासून पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST

चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्राअंतर्गत पाच विद्यालयातील शिक्षकांचे चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना ...

चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्राअंतर्गत पाच विद्यालयातील शिक्षकांचे चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. .

चंद्रपूर जिल्ह्यातील ना. ज. राऊत विद्यालय अडेगाव (देश ) ता. चिमूर, सरस्वती विद्यालय कोजबी, ता. नागभीड, प्रियदर्शिनी विद्यालय साखरी, ता. राजुरा, चेतना माध्यमिक विद्यालय मजरा ता. वरोरा, सावित्रीबाई फुले विद्यालय मासळ (बु) ता. चिमूर शाळामधील कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी वेतन अधीक्षक बोदाडकर यांच्याशी संपर्क साधून पाचही शाळेचे त्वरीत वेतन करण्याचा आदेश दिला. यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भाष्कर बावणकर, संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर, जिल्हा मार्गदर्शक किशोर हजारे, मुख्याध्यापक अडेगाव (देश), मुख्यध्यापक सुखदेव रामटेके, मुख्यध्यापिका ठवरे, मुख्यध्यापक बोकडे, मुख्यध्यापक थिपे आदी उपस्थित होते .