प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शिक्षकांचे वेतन प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:15+5:302021-02-05T07:35:15+5:30

चिमूर : शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्यात एक तारखेला करण्याचे आदेश असतानाही चिमूर पंचायत समितीच्या लालफीतशाहीमुळे डिसेंबर ...

Teachers' salaries pending due to administration's indifference | प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शिक्षकांचे वेतन प्रलंबित

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शिक्षकांचे वेतन प्रलंबित

चिमूर : शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्यात एक तारखेला करण्याचे आदेश असतानाही चिमूर पंचायत समितीच्या लालफीतशाहीमुळे डिसेंबर महिन्याचे वेतन अडले आहे. त्यामुळे शिक्षकांत असंतोष पसरला आहे.

अखिल भारतीय शिक्षक संघ शाखा-चिमूरच्या वतीने गटविकास अधिकारी यांची शिक्षकांच्या वेतन अनुषंगाने भेट घेतली असता, त्यांनी दोन दिवसांत वेतन होईल, असे संघटनेला आश्वस्त केले होते, परंतु डिसेंबर- २०चे वित्तप्रेषण जि.प.चंद्रपूरकडून आठ दिवसांआधी प्राप्त होऊनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वेतनास विलंब होत आहे. याबाबत संघटनेतर्फे पाठपुरावा केला असता, वित्त विभागाकडून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहे. शिक्षकांचे वेतन विनाविलंब करण्यात यावे, अन्यथा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा-चिमूरच्या वतीने घेराव आंदोलन करण्याचा इशारा.

अखिल भारतीय शिक्षक संघ अध्यक्ष सुनील केळझरकर यांनी दिला आहे.

Web Title: Teachers' salaries pending due to administration's indifference