शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा घ्या आॅनलाईन

By admin | Updated: August 1, 2014 00:12 IST

जिल्ह्यातील नागरिकांना आॅनलाईन सातबारा देण्याच्या योजनेला उद्या १ आॅगस्टपासून कोरपना तालुक्यातून प्रारंभ होत आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना संगणकीकृत सातबारा

आज कोरपनातून प्रारंभ : तीन महिन्यांत जिल्हाभरचंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांना आॅनलाईन सातबारा देण्याच्या योजनेला उद्या १ आॅगस्टपासून कोरपना तालुक्यातून प्रारंभ होत आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना संगणकीकृत सातबारा देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची योजना आहे. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील पाच लाख १० हजार ६४१ सातबाराचे संगणकीकरण करण्याचे काम तीन महिन्यात केले जाईल. आॅनलाईन सातबारा या योजनेचा प्रारंभ १ आॅगस्ट रोजी कोरपना तालुक्यापासून करण्यात येणार आहे. यानिमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील सामूहिक व वैयक्तिक वनहक्क दावे प्रदान करण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी तीन हजार ८१ वैयक्तिक वनहक्क वाटप करण्यात आले. त्यापैकी १७१५ व्यक्तींना सातबारा देण्यात आले. या कार्यक्रमात २६८ सातबारा वाटप करण्यात येणार असून उर्वरित वनहक्क दावे तीन महिन्यात वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आॅनलाईन कामकाजासाठी जिल्ह्यातील १२८ तलाठ्यांना लॅपटॉपचा पुरवठा केला असून उर्वरित लॅपटॉप लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भूमिधारी ते भूमिस्वामी करण्यासाठी विशेष मोहीम राबविल्याचे सांगून ६० हजार भूमिधारीचे भूमिस्वामीमध्ये रुपांतर करण्यात आले असून १ आॅगस्टच्या कार्यक्रमामध्ये ५०० भूमीस्वामीधारकांना सातबारा वाटप करण्यात येणार आहेत. महसूल दिनाच्या निमित्ताने महाआॅनलाईनमार्फत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, वय व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलियर, शिधापत्रीका, अल्पभूधारक प्रमाणपत्र, सातबारा व आठ (अ) अशा दहा सेवा नागरिकांना देण्यात येणार आहेत. महसूल अभिलेख्यांचे डिजीटायजेशन करण्यासाठी १ आॅगस्टपासून जिल्ह्यात स्कॅनिंग सुरु करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी तीन महिन्यात अभिलेख्यांचे डिजीटायजेशन होईल. उर्वरित १० तालुक्यातील काम टप्प्याटप्याने येत्या काही दिवसात करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सी. एस. डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे व अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)