शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबातील वनरक्षक, वनपाल एकस्तर वेतनापासून वंचित

By admin | Updated: February 24, 2016 00:50 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनाचा लाभ दिला जातो. मात्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ...

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनाचा लाभ दिला जातो. मात्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आदिवासीबहुल व दुर्गम भागातील वनरक्षक, वनपाल मात्र एकस्तर वेतनापासून वंचित आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात संघटनेच्या शिष्टमंडळाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी. गरड व चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांची भेट घेऊन ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वनमजूर, वनरक्षक व वनपाल यांना तातडीने एकस्तर वेतन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. चंद्रपूर वनवृत्तातील नियत क्षेत्राची सीमा निश्चित नसल्यामुळे संरक्षणाचे कर्तव्य पार पाडताना वनरक्षक व वनपालांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.. त्यामुळे सदर नियत क्षेत्राची सीमा निश्चिती करण्याचे काम वन सर्वेक्षकाद्वारे करण्यात यावे. सदर सीमा निश्चिती नसल्यामुळे वनरक्षक व वनपालांना कर्तव्य पार पाडताना कर्तव्यात कसूर असल्याचा दोषारोप करण्यात येऊ नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यासोबतच विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिष्टमंडळात वनरक्षक व वनपाल संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल मंत्रिवार, सचिव भारत मडावी, शंकर देठेकर, विदेश गलगट, बी.के.तुपे, पी.एस. झाडे, व्ही.एच. राखुंडे, डी.एल. उमरे, ए.बी.गेडाम, एन.आर. चाफले, आय.आर. फारूखी, सुरेश मांदाडे, अजय तिजारे, प्रवीण बोबाटे, डी.एम. चौधरी, मनोज वानखेडे, मनीष निमकर, विजय मोरे, मारोती पुल्लेवार, उज्ज्वला मडावी, सपना मोडक, पूजा महाजन, टीना काळे, सुमेद शिंदे, सुनिल गाजलवार, महादेव जाधव, प्रदीप बोरकर, जितेंद्र वैद्य, कल्याणी रणदिवे, लता गावंडे, वैशाली चिडे व अन्य संघटनांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)