लोक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:26 IST2021-02-07T04:26:36+5:302021-02-07T04:26:36+5:30

सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील लोक विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात शासनाच्या वतीने इयत्ता १ ते १२ ...

Suyash of Lok Vidyalaya students | लोक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश

लोक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश

सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील लोक विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात शासनाच्या वतीने इयत्ता १ ते १२ च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रणालीनुसार 'बालदिवस सप्ताह' साजरा करण्यात आला होता.

यामध्ये येथील लोक विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले असून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

८ ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत शासनाच्या वतीने "बालदिवस सप्ताह" साजरा करण्यात आला होता. यामध्ये येथील लोक विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी "बालदिवस सप्ताह" अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला होता. यात या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले असून शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मंथन टिकाराम निकुरे, जानवी दीपक बोरकर, बाली कृष्णा निकुरे, प्राची कृष्णा निकुरे, धनश्री रत्नाकर बोरकर, सुचिता रामू निकुरे, मयूर राजेश रामटेके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Web Title: Suyash of Lok Vidyalaya students