शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या झटक्याने विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:59 IST

तालुक्यापासून २० किमी अंतरावर असलेल्या बेलारा येथील जि.प. शाळेत एक विद्यार्थ्याला विजेचा झटका लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

उजवा हाताला दुखापत : बेलारा जिल्हा परिषद शाळेतील घटनालोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यापासून २० किमी अंतरावर असलेल्या बेलारा येथील जि.प. शाळेत एक विद्यार्थ्याला विजेचा झटका लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तो खेळत असताना अर्थिंगला हात लागल्याने विजेचा झटका लागला. ही घटना शनिवारी १२.३० वाजता घडली. कुणाल घनश्याम दोडके (९) असे विद्यार्थ्याचे नाव आहे.कुणाल हा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी नसून तो आश्रम शाळेत शिकतो. घराच्या बाजुलाच जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेच्या पटांगणात तो मित्रासोबत खेळत होता. खेळता-खेळता शाळेच्या भिंतीला लावून असलेल्या अर्थिंगला त्याचा उजवा हात लागल्याने तो चिपकला. त्यामुळे त्याने व मित्रांनी आरडाओरड केल्याने गावकरी जमा झाले. त्याला अर्थिंग पासून सोडविन्यासाठी अनेक कुल्पत्या केल्या. तेव्हा त्याचा हात अर्थिंगपासून दूर झाला व गावकऱ्याच्या सर्तकतेने कुणालचा जीव वाचला.गावकऱ्यांनी कुणालला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले. त्यांच्या उजव्या हाताला जखम झाल्याने व हातातील व शरीरातील रक्त गोठल्याने कुणालवर प्राथमिक उपचार करुन त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. चिमूर पं.स.चे गटशिक्षण अधिकारी किशोर पिसे यांना घटना माहित होताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांची भेट घेतली व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली.तालुक्यात जिल्हा पषिदेच्या १६० शाळा व खाजगी ४५ शाळा आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही. काही शाळेत व्यवस्था आहे पण त्या सुद्धा नाममात्र आहेत. सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळे शिक्षण विभागाने गंभीर दखल घेवून शाळांमध्ये अशा गंभीर घटना घडू नये, म्हणून शाळेतील विजेची व्यवस्था, देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.