गरीब मजुरांसाठी विद्यार्थी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:33+5:30

पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील अक्षय वाकूडकर यांनी 'मिशन मॅथेमॅटीक्स' च्या माध्यमातून कोरोना संकटात नवनवीन उपक्रम राबवित आहे. त्यांनी गणित विषयाबाबतची विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर करण्याकरीता गावागावातील भिंतीवर गणितीय सुत्रे रेखाटले. त्या उपक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.

Student streets for poor laborers | गरीब मजुरांसाठी विद्यार्थी रस्त्यावर

गरीब मजुरांसाठी विद्यार्थी रस्त्यावर

Next
ठळक मुद्देगरीब मजुरांची व्यथा ऐकवित जमा केला निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
घोसरी : कोरोनाच्या दुष्टचक्रात हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल होत असून रोजगार नसल्याने उपासमारीची परिस्थिती आलेली आहे. अशा परिस्थितीत अनेक समाज घटकांनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे. पोंभुर्णा तालुक्यातील मौजा घोसरी येथील मिशन मॅथेमॅटीक्सच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन लोकांना गरीब मजुरांची व्यथा ऐकविली. या अभिनव उपक्रमातून एकाच दिवशी गरीब मजुरांच्या मदतीसाठी १० हजारांचा निधी जमा केला आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील अक्षय वाकूडकर यांनी 'मिशन मॅथेमॅटीक्स' च्या माध्यमातून कोरोना संकटात नवनवीन उपक्रम राबवित आहे. त्यांनी गणित विषयाबाबतची विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर करण्याकरीता गावागावातील भिंतीवर गणितीय सुत्रे रेखाटले. त्या उपक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.
'मिशन मॅथेमॅटीक्स' हा उपक्रम अभ्यासापूरता मर्यादित ठेवला नाही. सध्या लॉकडाऊनमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. शासन तर मदत करत आहेच, आपणही करावी, यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून रस्त्यावर येत घोसरी व नांदगाव या गावातील लोकांकडून १० हजाराचा मदत निधी संकलित केला. सदर निधी शासनाकडे जमा करण्यात येणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन
'मिशन मॅथेमॅटीक्स' च्या टीमसोबत अवनी वाकुडकर, पूर्वा भोयर, तक्ष वाकुडकर, पृथ्वी नरूले, समिरा भोयर , स्वरा वाकुडकर ही शाळकरी मुले सामाजिक अंतर पाळत मास्क लावून मोठया उत्साहाने निधी संकलित करीत आहेत.

Web Title: Student streets for poor laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.