कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:54+5:30

आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी गुरूवारपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. प्रलंबित मागण्यांचे निवेदन सोमवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.

The strike of contract health workers continues | कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

ठळक मुद्देआंदोलनाचा चौथा दिवस : आयुक्तांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी गुरूवारपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. प्रलंबित मागण्यांचे निवेदन सोमवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील ७५० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बल्लारपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय व नागरी केंद्रातील ४३ कर्मचारी आहेत. सर्व कर्मचारी आरोग्य विभागात १० ते १२ वर्षांपासून कमी मानधनात सेवा देत आहेत. परंतु अजूनही मागण्या मंजूर झाल्या नाही, असा आरोप कर्मचाºयांनी केला. विविध मागण्यांचे निवेदन ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. अर्पिता वावरकर यांच्याकडे सादर केले.
 

Web Title: The strike of contract health workers continues