शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पारधीगुडा मंगी रस्त्याने शेतात जाणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता तयार करताना कंत्राटदाराने खर्च वाचविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून माती न आणता रस्त्याच्या बाजूला मोठी नाली काढून त्या नालीतील माती रस्त्यावर टाकली आहे.

ठळक मुद्देतीन गावातील शेतकऱ्यांना अडचण : बांधकामही निकृष्ट दर्जाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पारधीगुडा-मंगी रस्त्याचे सुरू असलेले बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. कंत्राटदार थातूरमातूर बांधकाम करीत असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय या रस्त्यामुळे पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील ५० ते ६० शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वाटच बंद झाली आहे. सबंधित विभागाने रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबूलवार व गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले आहे.राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता तयार करताना कंत्राटदाराने खर्च वाचविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून माती न आणता रस्त्याच्या बाजूला मोठी नाली काढून त्या नालीतील माती रस्त्यावर टाकली आहे. या मार्गावरील नाल्यात थातूरमातूर सिमेंट पाईप टाकून काम करण्यात आले आहे. पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूला मोठी नाली काढल्याने या परिसरात शेती करणाºया पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील शेतकºयांना शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. रस्ता बांधकाम करताना रस्ता खचून जाऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. कंत्रादारांकडून नाली बांधकाम करून त्यावर छोटा सिमेंट काँक्रीट रपटा बांधणे गरजेचे होते. परंतू चांगल्या कामांना बगल देत निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी विविध अवजारे घेऊन शेतात जात असतात. मात्र या रस्त्या बंद झाल्याने शेतकºयांना मोठी अडचण जात आहे. खरीप हंगामपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला परिसरातील शेतकऱ्याच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनातून केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील ५० ते ६० शेतकऱ्याची शेतात जाण्याची वाटच बंद झाली आहे. रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या बांधकामाची सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी चौकशी करावी.-गोपाल जंबूलवार,उपसरपंच, पाचगाव ग्रामपंचायत.

टॅग्स :agricultureशेती