शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कामात चोरीचा मुरुम

By admin | Updated: April 29, 2015 01:18 IST

नांदा ते राजुरगुडा या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पूरग्रस्त निधीतून पाच लाख रुपये खर्चून करण्यात येत आहे.

चंद्रपूर : नांदा ते राजुरगुडा या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पूरग्रस्त निधीतून पाच लाख रुपये खर्चून करण्यात येत आहे. मात्र या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या लाल मातीमिश्रीत चोरीच्या मुरुमाचा वापर होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या कामाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ठेकेदार इस्टिमेटनुसार काम करीत नसून त्यातून जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंत्याचेही चांगलेच फावत आहे. या अगोदरचसुद्धा नांदा- पिंपळगाव या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. २० लाख रुपयांच्या पूरग्रस्त निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या क्षेत्राच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सरोज मुनोत यांना गावकऱ्यांनी या कामाबाबत कल्पना दिली असता त्यांनीसुद्धा २१ एप्रिलला रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या कामात दोष आढळून आल्याने सदर कंत्राटदारावर कारवाई मागणी केलेली आहे.नांदा ग्रामपंचायत ही पेसाअंतर्गत येते. या ठिकाणी नाल्यातून रेतीचे व लाल मातीचे अवैधरीत्या उत्खनन होत आहे. मात्र सरपंच व सचिवाच्या दुर्लक्षतेमुळे ग्रामपंचायतीचे नुकसान होत आहे. (शहर प्रतिनिधी)रस्त्याला सिमेंटीकरणाची प्रतीक्षागडचांदूर : माणिकगड सिमेंट कंपनी प्रवेशद्वार ते पेट्रोलपंप चौक तसेच रेल्वे क्रॉसिंग ते सावित्रीबाई फुले महाविद्यालय चौक पावेतो रस्ता रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून केली जात आहे. मात्र दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला खड्डे पडले आहे. या रस्त्यावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. दोन्ही बाजूला ट्रकच्या रांगा असतात. त्यामुळे नेहमी अपघात होतात. औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहराची झपाट्याने वाढ होत आहे. शहरात माणिकगड सिमेंट उद्योग असून त्याचाच विस्तारित दुसरा प्रकल्प पूर्ण झाला आहे. जवळच अंबुजा, अल्ट्राटेक, मुरली सिमेंट प्रकल्प आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन सिमेंट ट्रक, कोळसा ट्रक व इतर वाहने दिवसरात्रं जात असतात नागरिकांची वर्दळसुद्धा याच मार्गाने असते. या रस्त्यावर आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शनिवार दोन तरुणांना जीव गमवावा लागला. या रस्त्याचे चौपदरीकरण करुन सुशोभिकरण करण्याची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व माणिकगड सिमेंट कंपनी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यास तयार आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग परवानगी देत नसल्याने हे काम रखडले आहे. माणिकगड ने या रस्त्याने अंदापत्रक शासनाकडे पाठविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे असे आहे की, कंपनीने शासनाकडे रक्कम जमा करावी त्यानंतर सा.बां. विभाग रस्त्याचे काम करेल. या दोघांच्या वादात गडचांदूरकरांचे हाल होत आहेत. या परिसरातील लोकप्रतिनिधींनी यांनी याकडे लक्ष देऊन रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे.