शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींविषयी राज्य शासन उदासीन

By admin | Updated: June 28, 2014 23:30 IST

ओबीसी आरक्षणाविषयी राज्य शासनाने वेळकाढू धोरण स्विकारले आहे. त्यामुळे आजपर्यंत आश्वासन देऊन केवळ तोंडाला पाने पुसली आहे. याला विदर्भातील ओबीसी समाजाचे मंत्री व लोकप्रतिनिधींची उदासीनता

चंद्रपूर : ओबीसी आरक्षणाविषयी राज्य शासनाने वेळकाढू धोरण स्विकारले आहे. त्यामुळे आजपर्यंत आश्वासन देऊन केवळ तोंडाला पाने पुसली आहे. याला विदर्भातील ओबीसी समाजाचे मंत्री व लोकप्रतिनिधींची उदासीनता तितकीच कारणीभूत आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री व सरकारच्या विरोधात तिव्र भूमिका घेण्याचा इशारा ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर यांनी दिला.भारतीय राज्य घटनेच्या कलम ३४० नुसार ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे घटनात्मक दर्जा मिळाला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनात ओबीसींना नोकरी, शिक्षण व राजकीय आरक्षण मिळत आहे. त्यातून ओबीसींचा घटनात्मक दर्जा सिद्ध झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्वाड्यात मान्यता दिली आहे.ओबीसी कृती समितीच्या माध्यमातून सतत मागण्यांचा रेटा सुरू आहे. जसे १९३१ पासून न झालेली ओबीसी समाजाची जनगणना करणे, महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाने ओबीसी शिष्यवृत्तीबद्दल ३१ आॅगस्ट २०१३ चे परिपत्रक रद्द करणे या मागण्यांसाठी अनेक निवेदन, रास्ता रोको, प्रतिनिधीच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. मात्र, शासनाने लक्ष दिले नाही. आता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. पत्रपरिषदेला बबन फड, हिराचंद बोरकुटे, दिनेश चोखारे, नगरसेवक राहुल पावडे, राहुल बेले, बबन वानखेडे, राजेंद्र खांडेकर आदींची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)