रखडलेले अनुदान देण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:30+5:302021-02-05T07:39:30+5:30

मोटार वाहन कायद्यान्वये कारवाया चंद्रपूर : पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई सुरू केली आहे. नो पार्किंग १५, ...

Stagnant grant-giving movements | रखडलेले अनुदान देण्याच्या हालचाली

रखडलेले अनुदान देण्याच्या हालचाली

मोटार वाहन कायद्यान्वये कारवाया

चंद्रपूर : पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई सुरू केली आहे. नो पार्किंग १५, मद्यप्राशन पाच व इतर ५० अशा एकूण ७० कारवाया आठवडाभरात केल्या. आरोपींविरुद्ध विविध ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पिंपळगाव मार्गाची दुरुस्ती करावी

चिमूर : तालुक्यातील पिंपळगाव-नवतळा हे आठ किमी अंतर आहे. चार वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रिक्त पदांमुळे विविध योजना कागदावरच

सिंदेवाही : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना पशुपालक शेतक-यांपर्यंत पोहोचत नाही. पंचायत समितीने सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी मिळाली आहे. पण, पदे भरली नाहीत. त्यामुळे योजना कागदावरच राहिल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.

विशेष घटक योजनेतून वीज जोडणी

घुग्घुस : परिसरातील अनेक गावांमधील काही वॉर्डांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झाला नाही. या वॉर्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेतंर्गत वीज पुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे केली आहे.

घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव

राजुरा : तालुक्यातील अनेक गावांतील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. काही वॉर्डांत नाल्या बांधण्यात आल्या. पण, नियमित स्वच्छता होत नसल्याने ब-याच ठिकाणी पाणी साचून राहत असल्याचे दिसून येत आहे.

दीड लाखांचा दारूसाठा जप्त

चंद्रपूर: पोलिसांनी चार दिवसात विविध ठिकाणी धाड टाकून दीड लाखांचा दारूसाठा जप्त केला. यावेळी १५ गुन्ह्यांची नोंद करून पाच जणांना अटक केली. ही कारवाई चंद्रपूर शहर, दुर्गापूर, घुग्घुस, वरोरा, शेगाव, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल येथील पोलिसांनी आठवडाभरात केली.

जिल्ह्यात १३ जणांवर गुन्हा दाखल

चंद्रपूर : जिल्ह्यातील पोलिसांनी विशेष मोहीम राबवून विविध प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये कलम १०७ दंड प्रक्रिया अन्वये १० कलम १२२ मुंबई पोलीस कायदा अन्वये दोन, कलम ११०/११७ मुंबई पोलीस कायदा अन्वये एक, असे एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्ह्यात सुरूच राहणार आहे.

Web Title: Stagnant grant-giving movements