रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:38 IST2021-06-16T04:38:06+5:302021-06-16T04:38:06+5:30

वरोरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो तुटवडा भरून काढण्यासाठी हातभार म्हणून तालुका ...

Spontaneous response to blood donation camp | रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वरोरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो तुटवडा भरून काढण्यासाठी हातभार म्हणून तालुका शिवसेनेच्या वतीने युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

जुन्या नगर परिषद लगतच्या शिवसेना तालुका कार्यालयातील सभागृहात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, युवा सेनेचे जिल्हा चिटणीस मनीष जेठानी, शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप मेश्राम, युवा सेनेचे तालुकाप्रमुख भूषण बुरीले, नगरसेवक दिनेश यादव, नगरसेविका सुषमा भोयर, युवासेना शहर प्रमुख गणेश जानवे, समीर हक्के, बंडू खैरे, अनिल घाडगे आदी उपस्थित होते.

===Photopath===

140621\img-20210614-wa0093.jpg

===Caption===

warora

Web Title: Spontaneous response to blood donation camp